Перейти к содержимому

Vasota Jungle Trek | Nageshwar Temple | Nagfani Pinnacle | Sahyadri | Vlog 03

Trekker_Vaibhav

0:00 / 0:00

Vasota Jungle Trek | Nageshwar Temple | Nagfani Pinnacle | Sahyadri | Vlog 03

1 170 просмотров · 1 год назад
Trekker_Vaibhav
110 подписчиков
1 170 просмотров · 1 год назад
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात स्थित असलेला वासोटा किल्ला हा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. कोयना म्हटल्यावर लगेचच आपल्या डोळ्यासमोर पाणी आणि घनदाट जंगल येते. याच जंगलात एक “वाघ” म्हणजेच वासोटा किल्ला ठाण मांडून बसलेला आहे, आणि अश्या या किल्ल्याला किमान एकदा तरी भेट देऊन तेथील वैभव अनुभवले पाहिजे. सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर दिशेने पसरलेली आहे आणि या रांगेस समांतर घेरा-दातेगडाची रांग आहे. या दोन पर्वतरांगांच्या मधून कोयना नदी वाहते याला जावळीचे खोरे असेही म्हणतात. वासोटा किल्ला याच जावळीच्या खोर्‍यात, या दोन्ही रांगेच्या दरम्यान वसलेला आहे. येथे बांधलेले कोयना धरण आणि त्याचा ‘शिवसागर’ जलाशय किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पसरलेला आहे, ज्यामुळे परिसराला एक अद्वितीय दृश्य प्राप्त होते. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणातील बेलाग कडे या मुळे किल्ला सहज प्रवेश करण्यास कठीण आहे. यामुळे वासोटा किल्ल्याची नैसर्गिक दुर्गमता खूपच वाढली आहे. वासोटा किल्ल्यावर पोहोचण्याचे ३ मार्ग: १) बामणोली मार्ग: सातारा जिल्ह्यातील कास पठाराजवळच्या बामणोली गावातून हा मार्ग सुरू होतो. या मार्गातून बोटीने शिवसागर जलाशय पार करून किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. हा सर्वात प्रसिद्ध मार्ग असून बहुतांशी लोक याच मार्गाचा वापर करतात. २) चोरवणे मार्ग: कोकणातील खेड जवळील चोरवणे गावातून नागेश्वर गुहेकडे जाणारा हा मार्ग आहे. हा मार्ग खडतर असल्यामुळे साहसप्रियांना हा मार्ग आवडतो. नवख्या आणि जंगलाची माहिती नसणाऱ्या लोकांनी या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे. ३) रेडे घाट मार्ग: चिपळूणच्या तिवरे घाटातून रेडे घाट मार्गे हा मार्ग पार करावा लागतो. हा देखील खडतर असला तरी जंगलातून जात असल्याने या मार्गावर निसर्गाचा पुरेपूर आनंद आणि अनुभव घेता येतो. वासोटा किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवासच एक अविस्मरणीय अनुभव आहे. जंगलातून जाताना निसर्ग व चौबाजूंची हिरवाई, विविध झाडे, वेली, फुले, फुलपाखरे आणि पक्ष्यांच्या मधुर आवाजांचा आनंद मिळतो. शिवसागर जलाशय पार करून झाल्यानंतर बोटीतुन उतरल्यावर चालत जाताना पहिल्यांदा स्वच्छ पाण्याच्या ओढा लागतो, ज्यामुळे मार्ग अधिकच रोमांचक बनतो. हनुमानाचे सुंदर शिल्प या मार्गात दिसून येते, ज्यामुळे मनाला उभारी मिळते. मजलंदरमजाल करत साधारण दीड ते दोन तासांच्या पायपीटीनंतर वासोटा किल्ल्यावर पोहोचता येते. किल्यावर जाण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #vasotafort #nagfanipinnacle #nageshwar #sahyadri #mountains #youtube #viralvlogs #trekking #adbenture #gadkille #explore #satara #konkan #bamnoli #koynariver #wildlife #nature #jungle #sahyadritigerreserve #boating #shivsagarjalashay #boating #river #camping #thrill #experience #travel