Divya Sparshi Part –8
Lay bhari Adakari
0:00 / 0:00
Divya Sparshi Part –8
978 просмотров · 2 мес. назад
Lay bhari Adakari
348 подписчиков
978 просмотров · 2 мес. назад
#दिव्यस्पर्शी #DivyaSparshi #भाग3 #अभिवाचन #मराठीअभिवाचन #रामभोसले #बाबाजीमहाराज #धनंजयदेशपांडे #आध्यात्म #आध्यात्मिकप्रवास #मराठीपुस्तक #MarathiBook #BookReading #SpiritualJourney #MarathiAudiobook #मराठीसाहित्य #प्रसादप्रकाशन #लयभारीअदाकारी #YouTubeMarathi #SpiritualReading#fingar touchmasaj #marathi #मराठीकथा#स्वामीभक्ती #स्वामी #स्वामीसमर्थ
#bookreading #marathiaudiobook #लयभारीअदाकारी
दीड वर्षात रादीडम सर बार्कर यांच्या गळ्यातील ताईत झाला. सर बार्कर रामला बी. एफ. तसेच ब्लडी फुल म्हणून हाक मारत.राम झपाटल्यासारखा सरसाहेबांची विद्या आत्मसात करण्याच्या मागे लागला. सरसाहेब असे पावेतो एकही क्षण त्यांना तो सोडत नसे, त्यांचा प्रत्येक संकेत भावना हावभाव तो ओळखायला लागला. सर साहेब जे जे बोलतील ते तो कान देऊन ऐकायचा डोक्यात साठवायचा त्यांचा एकही शब्द त्याने कधी खाली पडू दिला नाही. सर साहेब स्टाफ शी विद्यार्थ्यांशी कसे वागतात त्यांना कोणत्या सूचना देतात हे तो ऐकायचा. अभ्यासाच्या नोट्स , बारकावे टिपून घेण आणि सर साहेबांनी विचारल्यावरच बोललं किंवा मतप्रदर्शन करणं हे त्यांनी अंगात मुरवून घेतलं. सर साहेबांच्या कपड्या लत्याच्या, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी सुद्धा त्याने समजून घेतल्या. इतकच काय तर सर साहेबांनी झोपेत कुस जरी बदलली तरी त्याला जाग येत असे. एकात्मता शिकण्याची विलक्षण आणि संपूर्ण शरणांगती सर साहेबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही ते त्याला स्वतःचा मानसपुत्र मानू लागले. सर साहेबांनी रामला त्यांची अत्यंत गुप्त आणि गुढ विद्या "फिंगर टच मसाज" नुसती शिकवली नाही तर सर्व अभ्यासात रामला स्वतःची अंत प्रेरणाशक्ती विकसित करण्याची विद्या सुद्धा सर साहेबांनी रामला शिकवली.
दीड वर्षात रामने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत नेला होता तो प्रसन्न होता ही प्रसन्नता तृप्ती आणि सर साहेबांच्या मानसपुत्राचे स्थान मिळाल्याचा आत्म गौरव त्याच्या चेहऱ्यावर झळकाला लागला. या तृप्तीचं आणखीन एक कारण होतं कदाचित तेच महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मयुरेशी झालेली भेट आणि तिचा सहवास.