Перейти к содержимому

BJP Shinde MLAs in Mumbai मुंबईत शिंदे-भाजपच्या आमदारांची पोलखोल?

Time Maharashtra

0:00 / 0:00

BJP Shinde MLAs in Mumbai मुंबईत शिंदे-भाजपच्या आमदारांची पोलखोल?

5 513 просмотров · 1 день назад
Time Maharashtra
336 тыс. подписчиков
5 513 просмотров · 1 день назад
मुंबईच्या प्रश्नांवर विधानसभेत सर्वाधिक आवाज कोण उठवतंय? सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे आमदार की विरोधी बाकांवरील काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार? प्रजा फाउंडेशनच्या Mumbai MLA Report Card 2026 मध्ये मुंबईतील 36 आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. या अहवालानुसार सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 5 आमदारांमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख, ज्योती गायकवाड आणि ठाकरे गटाचे सुनील प्रभू व मनोज जामसुतकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या टॉप 5 मध्ये सत्ताधारी पक्षाचा एकही आमदार नाही. दुसरीकडे तळाच्या पाचमध्ये शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, दिलीप लांडे आणि भाजपचे राम कदम व कालिदास कोळंबकर यांची नावं आहेत. प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार 2009-10च्या तुलनेत 2024-25 दरम्यान मुंबईच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तब्बल 72 टक्क्यांची घट झाली आहे. मग मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत कोण सर्वाधिक सक्रिय आहे? सत्ताधारी आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह का निर्माण होतंय? आणि हा रिपोर्ट कार्ड आगामी मुंबईच्या राजकारणासाठी भाजप, शिंदे गट, काँग्रेस आणि ठाकरे गटासाठी किती महत्त्वाचा ठरणार? या संपूर्ण राजकीय चित्राचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये. Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल? •⁠ ⁠ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स •⁠ ⁠मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी •⁠ ⁠राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट •⁠ ⁠शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती आमची मूल्ये: •⁠ ⁠सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी •⁠ ⁠वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता •⁠ ⁠डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन 👉 Subscribe करा Time Maharashtra ला तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा. #prajafoundation #mumbaipolitics #mumbaimla #maharashtrapolitics #uddhavthackeray #shivsenaubt #congress #bjp #eknathshinde #devendrafadnavis #mumbainews #maharashtranews #marathinews #politicalanalysis #timemaharashtra