Gyanesh Kumar यांना पदावरुन हटवण्याची मागणी, पण CEC ना पदावरुन काढता येतं का ? कायदा काय सांगतो
BolBhidu
0:00 / 0:00
Gyanesh Kumar यांना पदावरुन हटवण्याची मागणी, पण CEC ना पदावरुन काढता येतं का ? कायदा काय सांगतो
285 838 просмотров · 2 дня назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
285 838 просмотров · 2 дня назад
#BolBhidu #GyaneshKumar #ECI
मुख्य निवडणूक आयुक्तांना तातडीने अटक करा, ज्ञानेश कुमार देशद्रोही आहेत, त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व निवडणुका रद्द करा. अश्या मागण्या देशातल्या विरोधी पक्षांकडून होत आहेत. तेही देशातली सर्वोच्च घटनात्मक संस्था असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात. मागच्या १० महिन्यांत इतर दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी कारभारावर १४ वेळा गंभीर आक्षेप नोंदवले असा आरोप, इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीतून करण्यात आला आणि देशभरात खळबळ उडाली. कारण आमचा विरोध डावलून, आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत, अशी तक्रार या दोन आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे केल्याचं सांगण्यात आलं. यानंतर अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंपासून ते सगळ्याच विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर राष्ट्रद्रोह आणि लोकशाहीची हत्या केल्याचे गंभीर आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची, अटकेची मागणी केली. पण मुळात देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट पदावरून हटवता येतं का? त्यांना अटक करणं कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का? २०२३ ला आलेल्या नवीन कायद्यात निवडणूक आयुक्तांना कोणतं संरक्षण देण्यात आलं आहे? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/