उपासनासंगीत क्र. 40- जगदुद्धारक प्रभु येशुला नित्य मुखे गावे।
Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
0:00 / 0:00
उपासनासंगीत क्र. 40- जगदुद्धारक प्रभु येशुला नित्य मुखे गावे।
9 186 просмотров · 2 года назад
Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
4,21 тыс. подписчиков
9 186 просмотров · 2 года назад
मनुष्यमात्राची पापापासून मुक्तता व्हावी यासाठी देवानं जगावर जी प्रीती केली त्याची प्रचिती ज्यांनी तारणाऱ्या येशूवर विश्वास ठेवलाय त्यांना कळणं सोप्प आहे. केवळ जन्मानं कोणी विश्वासी असेलच असंही नाही. त्यासाठी त्या तारक येशूची सुवार्ता ऐकल्यानंतर मनन-चिंतनासह विश्वासाची अनुभूती हवी. आणि हा अनुभव आल्यानंतर त्या जगदुद्धारक प्रभु येशूची स्तुती गीतं गावी, त्याची सेवा करावी असा ध्यासच लागतो.
विश्वासपूर्ण जीवनाची प्रचिती आल्यानंतर कविवर्य रेव्ह.नारायण वामन टिळक आपल्या काव्यात म्हणतात ...
जगदुद्धारक प्रभु येशूला
नित्य मुखे गावे ।
सेवावे करि नयनि बघावे
चित्ताने ध्यावे ॥
उपासनासंगीत गीत क्र.४० मधील ही काव्यरचना गीतरूपात सादर करीत आहे...
नाशिकरोड येथील सेंट फिलिप चर्चचा क्वायरग्रूप!!!
ऐकुया आणि आपणसुद्धा तालासुरात त्यांच्याबरोबर गाऊन प्रभू येशूची स्तुती करूया.