Перейти к содержимому

जगातील सर्वात शिस्तबद्ध पालखी?😲🚩 | मेहकर नगरी दुमदुमली २०२६!

श्रींचा पालखी सोहळा

0:00 / 0:00

जगातील सर्वात शिस्तबद्ध पालखी?😲🚩 | मेहकर नगरी दुमदुमली २०२६!

9 676 просмотров · 1 месяц назад
श्रींचा पालखी सोहळा
158 тыс. подписчиков
9 676 просмотров · 1 месяц назад
🚩 श्रींच्या आगमनाने मेहकर नगरी दुमदुमली! 🚩 दिनांक १४ ऑगस्ट २०२६, शुक्रवार, श्रावण शु. २ रोजी आषाढी वारीचा पवित्र सोहळा पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या श्रींच्या पालखी सोहळ्याचे मेहकर नगरीत भव्य आगमन झाले. विदर्भाच्या भूमीतून मार्गक्रमण करीत श्रींची पालखी मेहकर येथे मुक्कामी विसावली. श्रींच्या पालखीचे मेहकर नगरीत आगमन होताच संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. जागोजागी भाविकांनी श्रींच्या पालखीचे मनोभावे स्वागत केले. “गण गण गणात बोते” च्या जयघोषाने आणि भक्तिभावाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सुमारे दोन महिन्यांच्या या पवित्र पायी वारीत श्रींची पालखी श्री क्षेत्र शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव असा सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करीत आहे. या वारीत शेकडो वारकरी अखंड भक्तिभावाने सहभागी झाले असून, शिस्त, सेवा आणि भक्तीचा अनोखा संगम या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे. मेहकर येथील मुक्कामानंतर श्रींची पालखी पुढील परतीच्या प्रवासाला प्रस्थान समृद्धी महामार्गे भक्तिमय वातावरणात पवित्र वारी शेगावच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. विदर्भातील गावोगावी श्रींचे पालखीचे भाविकांकडून मनोभावे स्वागत होत आहे. आषाढी वारी सह परतीच्या या पवित्र प्रवासाची सांगता दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे श्रींचे स्वगृही भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण आगमनाने होणार आहे. 🚩🙏 श्रींचा पालखी सोहळा — वर्ष ५७ वे श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव