Перейти к содержимому

श्री तुळजाभवानी देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ

Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur

0:00 / 0:00

श्री तुळजाभवानी देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ

4 900 просмотров · 17 часов назад
Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur
15,1 тыс. подписчиков
4 900 просмотров · 17 часов назад
श्री तुळजाभवानी देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ धार्मिक परंपरेनुसार, महिषासुर या दैत्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला. या युद्धादरम्यान झालेल्या श्रमांनंतर देवी विश्रांतीसाठी मंचकी निद्रेला जाते, अशी श्रद्धा आहे. देवीच्या या निद्रेला ‘श्रमनिद्रा’ असे संबोधले जाते. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवीची मूर्ती सिंहाच्या गाभाऱ्यातील मानाच्या तेली लाकडी पलंगावर विराजमान करण्यात येते. देवीची ही श्रमनिद्रा सोमवार, दि. २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी पहाटे देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे. या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, सेवेकरी, मानकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.