Перейти к содержимому

Bhimashankar भीमाशंकर पुणे, धुक्यातील सुंदर पर्यटन स्थळ

Puneri Awazz

0:00 / 0:00

Bhimashankar भीमाशंकर पुणे, धुक्यातील सुंदर पर्यटन स्थळ

1 384 просмотра · 3 г. назад
Puneri Awazz
412 тыс. подписчиков
1 384 просмотра · 3 г. назад
#bhimashankar_jyotirling भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे.पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर हे भीमाशंकर मंदिर आहे. या मंदिराच्या येथून भीमा नदीचा उगम होतो. हे मंदिर प्राचीन काळापासूनचे आहे आणि महाभारत काळात पांडवांनी बांधले होते असे मानले जाते. १८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे ज्योतिर्लिंग आकाराने खूप मोठे आहे त्यामुळे या मंदिराला “मोटेश्वर महादेव” या नावाने देखील ओळखले जाते. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन खांबांमध्ये एक मोठी घंटा बांधलेली आहे. ही घंटा चिमाजी आप्पांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. या घंटेवर सन १७२९ असे इंग्रजी मध्ये नोंद केलेले आढळून येते. #maharashtra #pune #travel #shivmandir #sahyadri #beautifulnature #mostpopular #shravan #travel #jyotieegaikwad #puneriawazz #shivling #temple #history