Перейти к содержимому

पोवाडा भीमा कोरेगांवचा - महार योद्धयांची शौर्यगाथा | कबीर - शैलेश | लोकशाहीर निशांत शेख Bhimgeet

Arhant Sahare

0:00 / 0:00

पोवाडा भीमा कोरेगांवचा - महार योद्धयांची शौर्यगाथा | कबीर - शैलेश | लोकशाहीर निशांत शेख Bhimgeet

258 294 просмотра · 7 л. назад
Arhant Sahare
86,9 тыс. подписчиков
258 294 просмотра · 7 л. назад
#bhimSong #bhimgeet #MajhaBhiva #babasahebkegane For Business Inquiries & Sponsorship Email id :- arhant046@gmail.com रचणाकर -: करुणाकर आकरे स्वर -: शाहीर निशांत शेख संगीतकार -: कबीर-शैलेश रेकॉर्डिंग -: स्टुडिओ कबीरा महार योद्धायांची शोर्य गाथा पोवडे गातात शूर वीरांचे, त्यांच्या प्रराक्रमाचे, शौर्याचे, त्यांच्या वीरतेचे परिश्रम पूर्वक युद्धाची व्युहरचना करून मार्गातील अडचणी तुडवून विजयश्री खेचून आणनार्‍या धुरंधूर योद्ध्यांचे. लढाईच्या मैदानावर शत्रूला लोळवून, आपले युद्ध कौशल्य निर्वावाद्पणे सिद्ध करणार्‍या रण झुंजार बहादुरांचे. इतिहासाने असे असंख्य योध्ये पाहिले त्यातील अनगिनत तर विस्मृतीतही गेले, पण काहीच दंतकथा बनून इतिहासावर स्वार झाले. असे जागतिक इतिहासाने गौरविलेले अतुलनीय पराक्रमांचे मानदंड ठरलेले केवळ पाचशे महार योद्धे, पेशव्यात अठ्ठावीसहजार सैनिकांबरोबर भिडले. न भूतो न भविष्यती अशा अतुलनीय परक्रमाची शर्य करून एक जानेवारी अठराशे अठरा रोजी उन्मत पेशव्यांच्या छाताडावर पाय देऊन उभे टाकले. ब्रिटिश भारताच्या इतिहासात प्लासीच्या लढाई प्रमाणेच भीमा कोरेगावची लढाई सुद्धा एक टर्निंग पॉइंट आहे. त्या अभूतपूर्व लढाईची स्मृति, चिरस्तायी करण्यासाठी इंग्रज सरकारने उभारलेला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ त्यांची साक्ष देत आजही गौरवाने उभा आहे. त्या उतुंग वीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकार्‍यासोबत सोबत दरवर्षी एक जानेवारीला भीमाकोरेगाव येथील विजय स्तंभाजवळ उपस्थित राहत . आज लाखो लोक त्या बहदुराना अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे येतात. मी कवि नव्हे , गायक नव्हे, तसा शाहीरही नव्हे. कवीला काव्य प्रतिभा आणि गायक/ शाहिरणा गाता गळा असावा लागतो त्यापैकी माझ्याकडे काहीही नाही. तसाच मी इतिहासकारही नाही. त्यामुळे या पोवड्यात सुचविलेल्या सुधारनाचा विचार करणारच आहे. लवकरच त्या अविस्मरणीय लढाईचे द्विशताब्दी वर्ष उजाळणार आहे.त्या अनुषंगाने आपल्या बहादुर पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांचा गौरवार्थ हा पोवाडा लिहिला आहे. करुणा आकरे कांदिवली, मुंबई-६७ दि. २४ सप्टे. २०१५ धन्यवाद.