Перейти к содержимому

सासवड नगरपालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र? ; सत्ताधारी नगरसेवकांचा विरोधी नगरसेवकांवर हल्लाबोल!#news

सह्याद्री न्यूज नेटवर्क

0:00 / 0:00

सासवड नगरपालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र? ; सत्ताधारी नगरसेवकांचा विरोधी नगरसेवकांवर हल्लाबोल!#news

3 707 просмотров · 11 дней назад
सह्याद्री न्यूज नेटवर्क
8,93 тыс. подписчиков
3 707 просмотров · 11 дней назад
#SaswadWaterCrisis #सासवडपाणीप्रश्न #SaswadNagarPalika #पुरंदरपाणी #PaniAdhikar #WaterForSaswad #सासवडकरांच्या_हक्काचं_पाणी #SattadhariJababDo #सत्ताधारी_नगरसेवक_जाब_द्या #SaswadSattadhari #NagarPalikaSattadhari #जबाबदारी_कोणाची#VirodhiNagarSevak #विरोधकांचा_आवाज #SaswadVirodhak #JanatechaAawaz #विरोधी_नगरसेवक_लढा#Saswad #Purandar #PuneDistrict #MaharashtraPolitics #NagarPalikaElection #PaniTanchai #जळजीवन सासवड नगरपालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र?; प्रभाग क्रमांक ८ मधील पाणीप्रश्नी सत्ताधारी नगरसेवकांचा विरोधकांवर हल्लाबोल सासवड : मागील काही दिवसांपासून सासवड शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाण्याच्या वॉलजवळ मृत कुत्रा आढळून आल्याने त्या ठिकाणी अळ्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेवरून विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी सासवड नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनावर हल्लाबोल केला होता. मात्र, संबंधित पाण्याची पाइपलाइन आणि वॉलची पाहणी केल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमधील वॉल पूर्णपणे बंद (पॅक) असल्याने बाहेरील जंतू अथवा अळ्या पाइपलाइनमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांना विचारले असता आम्हाला पाणी स्वच्छ येत असून कुठल्याही प्रकारची समस्या आमची नाही असे काही नागरिकांनी सांगितले, पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अळ्या आढळल्या नाहीत असे नागरिकांनी सांगितले याबाबत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राजन भैय्या जगताप यांनी विरोधकांवर टीका करत, “सासवड नगरपालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून आम्ही त्याचा निषेध करतो. संबंधित प्रभागात विरोधी पक्षाचे नगरसेवक असताना ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास का आली नाही? नागरिकांच्या प्रश्नांवर राजकारण न करता वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे,” असे म्हटले. तसेच, “सासवड शहराची बदनामी करू नका,” असे आवाहनही राजन भैय्या जगताप यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की सदर घटनेची आम्ही पोलीस स्टेशनला नोंद केली असून जाणून- बुजून मेलेला कुत्रा टाकण्यात आला आहे असे पत्र पोलीस स्टेशनला सासवड नगरपालिकेकडून देण्यात आले आहे दरम्यान, या घटनेची वस्तुस्थिती काय होती, मृत कुत्रा नेमका कधीपासून त्या ठिकाणी होता आणि संबंधित ठिकाणी पाणीपुरवठ्यावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम झाला का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. यावेळी नगरसेवक मनोहर तात्या जगताप, नगरसेवक अजित जगताप, नगरसेवक माऊली काका जगताप, नगरसेवक आबा गिरमे, माजी नगरसेवक तात्या भांडवलकर यांच्यासह संबंधित ठिकाणी राहणारे काही नागरिक उपस्थित होते.