Перейти к содержимому

Kalika Mata Mandir, Nashik||Navratri 2021 Aarti||Rhythm's Bond

Rhythm's Bond

0:00 / 0:00

Kalika Mata Mandir, Nashik||Navratri 2021 Aarti||Rhythm's Bond

1 052 просмотра · 5 лет назад
Rhythm's Bond
267 подписчиков
1 052 просмотра · 5 лет назад
|| या देवी सर्व भुतेषु मात्रुरुपेण स स्थिता || || नम स्तस्यै नम स्तस्यै नम स्तस्यै नमोनमः || नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४३ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. नवरात्रीच्या दिवसांत नाशिकचे सर्व रस्ते कालिकेच्या मंदिराकडेच जातात, असे म्हणतात. या जागृत देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती, असे जुनी माणसे सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा भरू लागली. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिकामाता मंदिरापर्यंत येऊ लागली. तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले. त्यावेळी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर जाते. हल्लीचे प्रशस्त व देखणे कालिका मंदिर व त्यातल्या महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती यांच्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करणाऱ्या प्रसन्न देवीमूर्तींचे दर्शन होताच भाविकांचे मनही क्षणार्धात प्रसन्न होते. मंदिराचा गाभाराही चांदीच्या कलाकुसरयुक्त पत्र्याने सुशोभित करण्यात आला आहे. हल्लीचे प्रशस्त व देखणे कालिका मंदिर व त्यातल्या महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती यांच्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करणाऱ्या प्रसन्न देवीमूर्तींचे दर्शन होताच भाविकांचे मनही क्षणार्धात प्रसन्न होते. मंदिराचा गाभाराही चांदीच्या कलाकुसरयुक्त पत्र्याने सुशोभित करण्यात आला आहे. गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे. सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर. यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसोबत ग्रामदैवत श्रीकालिका देवीमंदिर विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब तथा केशवराव गुलाबराव पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, विश्वस्थ किशोर कोठावळे, आबा पवार, दत्ता पाटील, भैयासाहेब कोठावळे, सतीश कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, राम पाटील, भारत पाटील, श्याम पाटील, संतोष कोठावळे, मंगेश कोठावळे, दिपक तळाजिया आदी तत्पर आहेत. नवरात्रोत्सवात श्रीकालिकादेवीला रोज पहाटे २ ते ४ या वेळेत गुलाबपाणी, पंचामृत, शुद्धपाण्याने अभिषेक करून साडी नेसवली जाते व संपूर्ण साजशृंगार केला जातो. रोज सकाळी ६ वाजता व सायंकाळी ७ वाजता देवीची आरती केली जाते. ही सर्व पूजा देवीचे पुजारी करतात. श्रीकालिकामाता हे नाशिकचे ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबरच इतर भाविकांची देखील अपार श्रद्धा या देवीवर आहे. श्रीकाल‌िकेची यात्रा हा लहान-मोठ्या समस्त नाशिककरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. नवरात्राच्या दहा दिवसांत त्र्यंबक नाका ते मुंबई नाका आणि महामार्ग बसस्थानक परिसर ते सारडा सर्कलचा सगळा परिसर यात्रामय झालेला असतो. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता कालिकेच्या यात्रेत अतिशय आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचा पाठ याठिकाणी नाशिककर गिरवताना दिसतात. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली विविध प्रकारची दुकाने, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे स्टॉल्स आणि नजर पोहचणार नाहीत एवढे उंचच्या उंच रहाटपाळणे हे या यात्रेचे वैशिष्ट्ये असते. लहान मुलांबरोबरच मोठी माणसे देखील ‘नको, नको’ म्हणत या रहाट पाळण्यात किंवा जायंट व्हीलवर बसण्याचा आनंद घेतात आणि मोठेपणीदेखील निजशैशव जपतात! नवरात्रांत नाशिकच्या कालिकेला १५ ते २० लाख भाविक दर्शनार्थ येतात. दररोज साधारण दीड लाख भाविक देवीचे दर्शन घेतात. देवीभक्तांना देवीचे विनात्रासाने दर्शन करता यावे यांसाठी महिला व पुरुष अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक, पोल‌िस, होमगार्ड, नागरी संरक्षणदल, माजी सैनिकदल, विश्वस्त मंडळाचे स्वयंसेवक, अनिरुद्धबापू अकादमी स्वयंसेवकांसह ४०० ते ५०० स्वयंसेवक २४ तास तैनात करण्यात आले आहेत.