किल्ले विशाळगड ते माचाळ पायी ट्रेक चालून चालून वाट लागली | Vishalgad To Machal Trek
Aniket Navale
0:00 / 0:00
किल्ले विशाळगड ते माचाळ पायी ट्रेक चालून चालून वाट लागली | Vishalgad To Machal Trek
5 379 просмотров · 3 года назад
Aniket Navale
166 подписчиков
5 379 просмотров · 3 года назад
किल्ले विशाळगड ते माचाळ पायी ट्रेक चालून चालून वाट लागली | Vishalgad To Machal Trek.
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत किल्ले विशाळगड ते माचाळ ट्रेक . हा ट्रक अंदाजे २० किलोमीटरचा असून यामध्ये आपण एक छोटी दरी उतरून पुन्हा डोंगर चढणार आहोत.
विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले.
हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला.
किल्ल्यावर जाण्याचे मार्ग
1. मलकापूर – गजापूर – विशाळगड
2. शाहूवाडी – पावनखिंड – गजापूर – विशाळगड
कोल्हापूर ते विशाळगड अंतर 80 किलोमीटर
जाण्यासाठी लागणार वेळ 2.30 ते 3 तास.