Перейти к содержимому

“५० वाऱ्या केल्या विठ्ठल भेटला नाही भुकेल्या आईने मला पाहिलं आणि म्हणाली, ‘विठ्ठल मला आज भेटला’” 🙏❤️

Sushil Shikhare

0:00 / 0:00

“५० वाऱ्या केल्या विठ्ठल भेटला नाही भुकेल्या आईने मला पाहिलं आणि म्हणाली, ‘विठ्ठल मला आज भेटला’” 🙏❤️

30 976 просмотров · 1 день назад
Sushil Shikhare
70,6 тыс. подписчиков
30 976 просмотров · 1 день назад
शुक्रवारचा गावचा बाजार… गर्दीमध्ये एक ९० वर्षांची आई भुकेने व्याकूळ होऊन लोकांकडे खायला मागत होती. काहींनी तिला हाकलून दिलं… मी तिला फक्त एवढंच म्हटलं, “आई… काही खायला देऊ का?” तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाली, “मी सकाळपासून उपाशी आहे…” तिला जेवण दिलं, साडी दिली, खर्चासाठी काही पैसे दिले आणि तिच्या घरी सोडण्यासाठी गाडीत बसवलं. आयुष्यात पहिल्यांदाच ती गाडीत बसली होती… आणि पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती ५० वाऱ्या करणारी वारकरी आई होती. गाडीत विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत जाता-जाता ती मला एकच वाक्य बोलली— “मी एवढ्या वाऱ्या केल्या… पण विठ्ठल मला आज भेटला.” त्या क्षणी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत… तिच्यासोबत माझ्याही डोळ्यात पाणी आलं. 🙏 माझी सर्वांना एकच विनंती आहे— कोणाला काही देता येत नसेल तर देऊ नका, पण भुकेल्या आणि वयस्कर माणसाचा अपमान करून त्याला हाकलून देऊ नका. ती आई म्हणाली, “माझं वय झालंय… नाहीतर मी कष्ट करून खाल्लं असतं.” माणुसकी दाखवण्यासाठी मोठं काही करण्याची गरज नसते… कधी कधी एका माणसाला प्रेमाने “आई” म्हणून हाक मारणंही पुरेसं असतं. ❤️ विठ्ठल मंदिरातच असेल असं नाही… कधी कधी तो आपल्या वाटेत भेटलेल्या माणसाच्या रूपातही भेटतो. 🙏❤️ #माणुसकी #विठ्ठल #वारकरी #आई #भुकेलीआई #मदतीचाहात #एकहातमदतीचा #महाराष्ट्र #सातारा #गावचाबाजार #माणुसकीजपा #विठ्ठलविठ्ठल #वारकरीसंप्रदाय #सेवा #समाजसेवा #मराठीव्हिडिओ #भावनिकव्हिडिओ#Sushilshikhare #huminity #helpinghands