कुंडलच्या क्रांतीअग्रणी कारखान्याचा देशात डंका ! | देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार
MAHARASHTRA NEWS EXPRESS
0:00 / 0:00
कुंडलच्या क्रांतीअग्रणी कारखान्याचा देशात डंका ! | देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार
3 426 просмотров · 3 нед. назад
MAHARASHTRA NEWS EXPRESS
185 подписчиков
3 426 просмотров · 3 нед. назад
सांगली : कुंडल येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा सन्मान मिळवला आहे.
सन २०२५-२६ गळीत हंगामातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा प्रतिष्ठेचा वसंतदादा पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ लि. (NFCSF), नवी दिल्ली यांच्या वतीने हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आला.
कुंडल आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशाची संपूर्ण बातमी पाहा.
महाराष्ट्र न्यूज एक्स्प्रेस — प्रत्येक बातमी जी तुमच्यापर्यंत!
#महाराष्ट्रन्यूजएक्स्प्रेस #सांगली #कुंडल #क्रांतीअग्रणी #साखरकारखाना #सहकारीसाखरकारखाना #वसंतदादापाटीलपुरस्कार #नितीनगडकरी #NFCSF #सांगलीन्यूज #महाराष्ट्रन्यूज #SugarFactory #SangliNews #Kundal #BreakingNews