"अनहद नाद, निर्भय बोलः” नीला भागवतांच्या आठवणी - भाग 3 - स्मृतिचित्रे
Shankar Brahme Samajvidnyan Granthalaya
0:00 / 0:00
"अनहद नाद, निर्भय बोलः” नीला भागवतांच्या आठवणी - भाग 3 - स्मृतिचित्रे
132 просмотра · 13 дней назад
Shankar Brahme Samajvidnyan Granthalaya
895 подписчиков
132 просмотра · 13 дней назад
नीला भागवतांनी आपली सांगीतिक परंपरा जितकी जपली तितकीच ती मोकळी केली. नव्या युगाला अनुरूप नव्या बंदिशी, नवे बोल, नव्या सांगीतिक परंपरा घडवल्या. नवे शिष्य घडवले. मार्क्सवाद व स्त्रीवाद अगदी तरुणपणी आत्मसात केले व आपल्या जीवनात व गाण्यात उतरवले. आपले सामाजिक भान सतत जपले. माणसांवर आणि परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्यांवर निखळ प्रेम केले.
नीला भागवतांच्या स्मृतीला आमच्यातर्फे अभिवादन.
शंकर ब्रह्मे ग्रंथालयाने त्यांच्यासाठी दिनांक दहा मे रोजी "अनहद नाद, निर्भय बोलः” नीला भागवतांच्या आठवणी’हा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे तीन भाग होते. भाग १ मध्ये गाणे होते, भाग २ मध्ये त्यांच्यावरील एक लघुपट दाखवला गेला व भाग ३ मध्ये त्यांच्या आठवणी.
भाग १ मध्ये अमरेंद्र धनेशवर, नील खोपकर व स्वानंदी सडोलीकर यांचे गाणे झाले. साथीला व्हायोलिनवर सविता सुपणेकर व तबल्यावर यश सोमण होते.
भाग २ मध्ये सावनी विनिता यांनी दिग्दर्शित केलेली नीला भागवतांवरील "समांतर" हा लघुपट दाखवला गेला.
भाग ३ मध्ये आठवणींचे कथन होणार होते पण वेळे अभावी त्या दिवशी ते करता आले नाही. त्यापैकी काहीजणांनी आपले कथन पाठवले आहे. ती कथने संकलित करून इथे देत आहोत.