Перейти к содержимому

रामरक्षा प्रवचन-१३|श्रीरामांचे संपूर्ण चरित्र म्हणजे ‘मानवाने कसे वागावे’ याचा आदर्श |Aniruddha Bapu

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

रामरक्षा प्रवचन-१३|श्रीरामांचे संपूर्ण चरित्र म्हणजे ‘मानवाने कसे वागावे’ याचा आदर्श |Aniruddha Bapu

25 647 просмотров · 1 год назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
348 тыс. подписчиков
25 647 просмотров · 1 год назад
श्रीरामांचे ‘चरित’ म्हणजे काय आणि ते कुठल्या पडद्यावर आम्हाला दिसू शकते, ते मागील प्रवचनातून समजावून सांगितल्यानंतर सद्गुरु अनिरुद्ध बापू, दिनांक १० फेब्रुवारी २००५ रोजी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनामध्ये पुढील ओळींकडे आपल्याला घेऊन जात आहेत - ‘ध्यात्वा नीलोत्पल: श्यामं। रामं राजीवलोचनम्॥ जानकी लक्ष्मणोपेतं। जटामुकुटमंडितम्॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्। स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतं अजं विभुम्॥’ आता श्रीरामांचे गुणवर्णन सुरू झालेले आहे. ध्यानमंत्रानंतर इथे पुन्हा श्रीरामांच्या डोळ्यांविषयीच सांगितले गेले आहे आणि ‘राजीवलोचन’ हे भगवंताचे सगळ्यात महत्त्वाचे गुणवर्णन कसे, ते सद्गुरु बापू समजावून सांगत आहेत. आम्हाला प्रत्येकालाच आमच्या जीवनामध्ये विकास साधायचा असतो. सद्गुरु अनिरुद्ध इथे उदाहरणांसहित स्पष्ट करतात की श्रीरामांचे डोळेच आम्हाला, आमचा गुणात्मक जीवनविकास करून घेण्याच्या प्रयासांमध्ये जास्तीत जास्त सहाय्य का करू शकतात. पुढे सद्गुरु बापू पुढील ओळींचे सरलार्थ सुरुवातीला समजावून सांगतात व नंतर त्यांमागील गूढार्थही स्पष्ट करतात - ‘जानकी लक्ष्मणोपेतं, जटामुकुटमंडितम्, सासितूणधनुर्बाणपाणिं, नक्तं चरान्तकम्, स्वलीलया, जगत्रातुं, आविर्भूतं, अजं, विभुम्’. तसेच तो परमात्मा ‘राम , ‘कृष्ण’ आदि अवतारांमध्ये येतो, ह्याचा अर्थ तो जन्म घेतोच. मग त्याला ‘अज’ - ‘अ-ज’ (मनुष्यांप्रमाणे पुन्हा-पुन्हा जन्म न घेणारा) का म्हटले गेले आहे, हे रहस्यदेखील ते उलगडून सांगतात. त्याचबरोबर, ‘लीला’ म्हणजे काय व हे संपूर्ण विश्व हे त्या परमात्म्याचे ‘कर्म’ नसून ते परमात्म्याची ‘लीला’ कशी आहे, हेसुद्धा सद्गुरु बापू ‘स्वलीलया’ शब्दाचा अर्थ सांगताना स्पष्ट करतात. त्या अनुषंगाने, ‘आस्तिक’ म्हणजे काय व ‘नास्तिक’ म्हणजे काय, हेदेखील ते समजावून सांगतात व हे सांगतानाच, ‘आस्तिक माणूस कधीच पराभूत का होऊ शकत नाही’ हे रहस्यदेखील ते उलगडून दाखवतात. आमच्या वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरसुद्धा भगवंताचे कार्य कसे चालते, हे स्पष्ट करताना, ह्या ‘मायामनुष्यं हरि’ रामाचे पूर्ण चरित्र हे ‘मानवाने कसे वागावे’ त्याचा आदर्श वस्तुपाठ असल्याची जाणीव सद्गुरु अनिरुद्ध बापू शेवटी आम्हाला करून देतात. Previous Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-१२ | श्रीरामांचे ‘चरित’ म्...   Next Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-१४ | श्रीरामांबरोबरच जानकी...   #aniruddhabapu #ramraksha #ramrakshastotra ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------