Перейти к содержимому

@घरच्या घरी बनवलेले लहान मुलांना नक्की आवडतील असे मुलायम रवा -बेसन पेढे!👌👌👌😋

Annapurna - chav gruhinichya hatachi

0:00 / 0:00

@घरच्या घरी बनवलेले लहान मुलांना नक्की आवडतील असे मुलायम रवा -बेसन पेढे!👌👌👌😋

151 просмотр · 11 дней назад
Annapurna - chav gruhinichya hatachi
99 подписчиков
151 просмотр · 11 дней назад
तोंडात विरघळणारे मऊ आणि दाणेदार रवा बेसन पेढे! Rava Besan Pedha Recipe in Marathi 😋​अगदी कमी साहित्यात बनवा परफेक्ट रवा बेसन पेढा लागणारे साहित्य : 1)एक वाटी रवा 2)एक वाटी साखर 3)एक लिटर दूध 4) 3-4 चमचे बेसन 5) 3-4चमचे तूप 6)1 छोटा च.वेलची पावडर 7) कलरचे marble पेढे बनवण्यासाठी केसरी आणि पिवळा रंग 8) सजावटी साठी काजू आणि बदाम ( optinal ) महत्त्वाची टीप:जास्त गोड आवडत असेल तर साखर अर्धी वाटी एक्स्ट्रा घालू शकता. कृती: 1) सर्वप्रथम रवा आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचा आहे. 2) नंतर तो चाळणीतून चाळून घ्यायचा आहे. 3) त्याचबरोबर बेसन सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. 4) कढईमध्ये तूप टाकून आपल्याला मिक्सर मधून वाटून घेतलेला रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आहे. 5) रवा खमंग भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे बेसन टाकून तोही चांगला परतून घ्यायचा आहे रव्या बरोबर. 6) रवा आणि बेसन तूप सुटेपर्यंत चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे . 7) भाजलेला रवा बेसनच मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे 8)नंतर एका पसरट भांड्यात दूध घेऊन तापत ठेवायचे आहे. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिटे ते दूध व्यवस्थित ढवळत राहायचे आहे. पाच ते सात मिनिटानंतर दुधामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. 9) साखर नीट दुधामध्ये विरघळून घ्यायचे आहे त्यासाठी सतत ढवळत राहणं गरजेचं आहे. 10) दूध अगदी निम्मे होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे. 11) आटवून निम्म्या झालेल्या दुधामध्ये नंतर आपल्याला रवा बेसनचे खमंग भाजलेले मिश्रण टाकून घ्यायच आहे. 12) मिश्रण व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून त्याचा एकसंध गोळा होईपर्यंत हलवत राहायचे आहे. 13) तयार झालेला गोळा तळतात काढून त्याच्यापासून पेढे बनवायचे आहेत. गरम असतानाच आपल्याला पेढे बनवायचे आहेत त्यासाठी हाताला तूप लावून घेणे गरजेचे आहे. coloured मार्बल पेढे बनवण्यासाठी कृती : कलर चे मार्बल पेढे बनवण्यासाठी आपल्याला त्या मिश्रणातील काही मिश्रण बाजूला काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला हवेत ते रंग टाकून पेढे बनवायचे आहेत. 🙏माझ्या इतर रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏 चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही रेसिपी पाहू शकाल. धन्यवाद! ​#RavaBesanPedha ​#RavaPedha ​#BesanPedhaRecipe ​#MaharashtrianRecipes ​#IndianSweets ​#रवाबेसनपेढा ​#पारंपरिकरेसिपी ​#गोडपदार्थ ​#म्हारीरेसिपी ​#EasySweetRecipe ​#FestivalSweets ​#GharKaKhana ​#CookingChannel ​#RavaBesanPedha #RavaPedha #BesanPedhaRecipe #MaharashtrianRecipes #IndianSweets #रवाबेसनपेढा #पारंपरिकरेसिपी #गोडपदार्थ #EasySweetRecipe #फेस्टिवलस्विट्स    • @ 🔥ओल्या हिरव्या मुगाची झणझणीत आणि चटकदार ...