श्री रामवरदायिनी मंदिर (चोरवणे), चिपळूण |RAMVARDAYANI MANDIR | MUSAD | CHIPLUN TO CHORAVANE 🚗
EVERYTHING8
0:00 / 0:00
श्री रामवरदायिनी मंदिर (चोरवणे), चिपळूण |RAMVARDAYANI MANDIR | MUSAD | CHIPLUN TO CHORAVANE 🚗
13 572 просмотра · 4 года назад
EVERYTHING8
1,74 тыс. подписчиков
13 572 просмотра · 4 года назад
श्री रामवरदायिनी मंदिर (चोरवणे), चिपळूण |RAMVARDAYANI MANDIR | MUSAD | CHIPLUN TO CHORAVANE 🚗
चोरवणे हे गाव रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यात येते. चोरवणे गावात खेड आणि चिपळूण, दोन्हीकडून जाता येते. चिपळूण पासून चोरवणे हे गाव, साधारणपणे ४०-४२ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगेतील श्रीनागेश्वर आणि शिवकालीन ’वासोटा’[१] किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. वासोटा किल्ल्याचा कोकणातील पायथा म्हणजेच चोरवणे गाव. दुर्गप्रेमी, गिरिविहार करण्याऱ्या मंडळींना ’चोरवणे’ हे गाव नवीन नाही. ’वासोटा’ किल्ल्याच्या डोंगर रांगेतील एका सुळक्यावर एक प्राचीन ’शिवगुंफा’, श्रीशंकराचे स्थान आहे त्यास ’नागेश्वर’, ’नागेश्वरचा डोंगर’ म्हणतात. चोरवणे ते नागेश्वर हा ट्रेक साधारण दोन ते चार तासांचा आहे, चढाई खूप सरळ असल्याने, एका आख्ख्या डोंगराला अर्धप्रदक्षिणा घालून, मग ’नागेश्वराच्या’ अरुंद वाटेकडे जाता येते.
देवालय परिसर
देवळासमोर येताच, प्रथम दर्शनी दिसतो तो देवळाचा घुमट आणि परिसरातील दीपमाळेसारखा मनोरा. प्रवेशद्वाराशीच कोरलेले दोन स्तंभ आहेत. इतिहासाच्या पुसट झालेल्या खुणा जपत जपत ते अजूनही उभे आहेत. बहुधा ते स्तंभ नसून ’वीरगळ’[२]असावेत. देवीमंदिराच्या बाजूलाच एक प्राचीन कौलारू ’हनुमान’ मंदिर आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा मारुतींच्या मू्र्ती स्थापल्या. त्यापैकी त्यांनी स्थापलेल्या एखाद्या ’वीर हनुमानाची’ ही प्रतिकृती असावी, इथे पूर्वी देवळाबरोबर तालीम असावी असे वाटते. देवीच्या देवळाच्या प्रवेशद्वाराबाहेर एक अष्टकोनी चौथरा दिसला. आत शिरताना एक छोटा सभामंडप लागतो, नंतर गाभारा. तिथून पुढे आल्यावर गृहगर्भात देवीचे दर्शन होते. देवीची मूर्ती ही अश्वारूढ आहे, घोड्यावर स्वार झालेली ह्या चतुर्भुज देवीचे नाव आहे, ’श्रीरामवरदायिनी’, तिला ’श्रीरामवरदान देवी’ असेसुद्धा म्हणतात.
#chiplun #ramvardaynimandir #musad #chipluntochoravane #shetkari #choravane #india #photooftheday #love #maharashtra #nature #photography #ratnagiri #chiplunlife #beautiful #travel #sun #tflers #chiplun_photographers #chiplundiaries #colorful #video #sunset #sky #itsmychiplun #chiplunmarket #like #amazing #kokan #chiplunkar #chiplunphotography #follow #sunrise #photo #naturephotography
---
I'm using @tagsfinder_com (www.tagsfinder.com)
--
@www_aboutme_cc - one page with all your links to social profiles and pages.