Supreme Court LIVE : Eknath Shinde सरकार जाऊन Uddhav Thackeray पुन्हा मुख्यमंत्री होणार? | Shiv Sena
Mumbai Tak
0:00 / 0:00
Supreme Court LIVE : Eknath Shinde सरकार जाऊन Uddhav Thackeray पुन्हा मुख्यमंत्री होणार? | Shiv Sena
275 804 просмотра · Трансляция закончилась 4 года назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
275 804 просмотра · Трансляция закончилась 4 года назад
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#SupremeCourt #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #MumbaiNews
महाराष्ट्रातलां सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर आलाय. शिवसेना कुणाची हा वाद दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचा बनतोय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार कायम राहणार की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार याबद्दल चर्चा सुरू झाल्यात. राज्यात नवं सरकार आलं असलं, तरी राजकीय पेच सुटलेला नाही. आमदारांच्या निलंबनापासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला देण्यात आलेलं आव्हान, अशा अनेक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं होतं. त्यानंतर आज गुरुवारी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टा नेमके काय दिशानिर्देश देणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणात याचिकांची संख्या वाढत गेली. शिवसेनेच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.