खमंग आणि खुसखुशीत पुडाची वडी बनविण्यासाठी खास टिप्स । Kothimbir Vadi । सांबार वडी
Gharcha Swaad
0:00 / 0:00
खमंग आणि खुसखुशीत पुडाची वडी बनविण्यासाठी खास टिप्स । Kothimbir Vadi । सांबार वडी
120 499 просмотров · 7 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
120 499 просмотров · 7 л. назад
How To Make Pudachi Vadi | Sambar Vadi Recipe |सांबार वडी | Pudachi Vadi In Marathi |Kothimbir Vadi Recipe | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: http://bit.ly/2DFyOBX
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount
Tamarind Chutney Recipe 👉🏽 • How To Make Chutney For Chaat | Chutney fo...
Homemade Masala | घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट मसाला 👉🏽 • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
साहित्य 👉🏽 २ मोठी जूडी कोथिंबीर धुवून, स्वच्छ, कोरडी आणि बारीक चिरलेली, २½ कप चण्याचं पीठ, १½ कप मैदा, १ tsp ओवा, १½ tblsp काप केलेले काजू, १ tblsp चारोळी, १½ कप खिसलेलं सुकं खोबरं, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ tsp हळद, १ tblsp खसखस, १½ tblsp तीळ, १½ tblsp लाल मिरची पावडर, १ tblsp घरगुती लाल मसाला, ½ वाटी चिंचेची चटणी, चवीनुसार मीठ, ४ tblsp तेल मोहनासाठी, १ tblsp तेल फोडणीसाठी आणि पुडया तळतील इतके फ्राय करण्यासाठी तेल.
कृती 👉🏽 एका परातीत चण्याचं पीठ, मैदा, ओवा, ½ tsp हळद, १½ tsp लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. एका पण मध्ये मोहनासाठी कडकडीत तेल गरम करून घ्या. तयार मोहन पिठात घाला. आता साध्या पाण्याचा वापर करून पीठ घट्ट मळून घ्यावे. एका कढईत खसखस, तीळ, काजू, चारोळी, सुके खोबरे इत्यादी खरपूस आणि खमंग भाजून घ्यावे. तडख्याच्या पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. गरम तेलात प्रथम बारीक चिरलेली मिरची घाला. मिरची कडकडीत फुटू लागली कि त्यात ½ tsp हळद घाला गॅस बंद करून घ्या आणि लगेच त्यात आपला घरगुती मसाला घालावा. आता फोडणी पूर्णपणे थंड करून भाजलेल्या मिश्रणात घालावी, सोबत चवीनुसार मीठ घालून त्यात चिरलेलीकोथिंबीर घालावी. हे झालं पुड्यांचं सारण. आता तयार पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. प्रत्येक पुरीवर चिंचेची चटणी पसरवून घ्या. आता यात तयार सारण घालून चारही बाजूचे आवरण बंद करून पुड्या तयार करून घ्या. तयार पुड्या तेलात मध्यम आचेवर तांबूस होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या. गरमागरम खुशखुशीत खमंग पुडाच्या वड्यांचा आस्वाद टोमॅटो सॉस, दही कढी किंवा पुदिनाच्या चटणीसोबत घेऊ शकता. रेसीपी आवडल्यास लाईक, शेअर जरूर करा. धन्यवाद !
#Pudachivadi #nagpurspecialrecipe #sambarvadirecipe
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com