Penguin India चा पुस्तक छापायला नकार, Sonia Gandhi यांच्या Belonging: A Journey of Love वरुन वाद का?
BolBhidu
0:00 / 0:00
Penguin India चा पुस्तक छापायला नकार, Sonia Gandhi यांच्या Belonging: A Journey of Love वरुन वाद का?
93 770 просмотров · 21 час назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
93 770 просмотров · 21 час назад
#BolBhidu #SoniaGandhiBook #PenguinIndia
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं एक पुस्तक येतंय. हे पुस्तक म्हणजे सोनिया गांधींची आत्मकथा किंवा आत्मचरित्र नाही. आत्मचरित्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा पट मांडलेला असतो. पण सोनिया गांधींचं पुस्तक हे स्मृतिगाथा आहे. स्मृतीगाथा म्हणजे, लेखकाच्या आयुष्यातले काही ठराविक अनुभव. इंग्रजीत त्याला 'memoir' असं म्हणतात. सोनिया गांधी यांच्या या पुस्तकाचं नाव आहे, 'Belonging: A Journey of Love in India'. सोनिया गांधींचं हे पुस्तक अजून पब्लिश झालेलं नाही. १० नोव्हेंबर २०२६ ला या पुस्तकाचं जागतिक प्रकाशन होणार आहे. पण त्याआधीच भारतात यावरून वाद सुरु झाला आहे. जगातल्या सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक असलेलं 'पेंग्विन रँडम हाऊस' भारतात या पुस्तकाचं प्रकाशन करणार होतं. पण ऐनवेळी पेंग्विन इंडियानं पुस्तक छापण्यास नकार दिला, ज्यावरून मोठा वाद सुरू झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पेंग्विन पब्लिकेशन हे पुस्तक छापणार आहे. पण भारतात मात्र पेंग्विन कंपनीनं माघार घेतली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण सोनिया गांधी यांच्या या पुस्तकात नेमकं काय लिहिलं आहे? त्यांचं पुस्तक छापायला पेंग्विन इंडियानं नकार का दिलाय? पंतप्रधान मोदी, संघ आणि चीनच्या घुसखोरीबद्दल पुस्तकातून काय खुलासे झाले आहेत? पुस्तकातले वादग्रस्त मुद्दे, यावरून काँग्रेस आणि भाजपचे आरोप-प्रत्यारोप, सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/