Перейти к содержимому

NARNALA Fort | History | Melghat |नरनाळा किल्ल्याचा इतिहास | मेळघाट | सातपुडा

Explore with Dr. Jayant Wadatkar

0:00 / 0:00

NARNALA Fort | History | Melghat |नरनाळा किल्ल्याचा इतिहास | मेळघाट | सातपुडा

6 943 просмотра · 5 л. назад
Explore with Dr. Jayant Wadatkar
26,7 тыс. подписчиков
6 943 просмотра · 5 л. назад
History of Narnala Fort नरनाळा किल्ल्याचा इतिहास मेळघाटातील नरनाळा किल्ला डॉ. जयंत वडतकर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वतात वसलेला असून या ठिकाणी अकोट येथून पोपटखेड मार्गे जाता येते. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानुर हे गाव असून हे ठिकाण किल्ल्यावरील सफारी किंवा पदभ्रमण करून जाणाऱ्यांसाठी किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे. या ठिकाणी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे पर्यटक संकुल व माहिती केंद्र असून या ठिकाणी प्रवेश भरून आपल्याला किल्ल्यावर जाता येते. समुद्रसपाटीपासून सुमारे ९५० मीटर उंचीवर सातपुड्यातील उंच डोंगरावर नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या उंच पठारी भागात हा किल्ला साधारणता दीड किमी चौरस किमी क्षेत्रात विस्तारलेला असून नरनाळा अभयारण्य क्षेत्र सुमारे १२ चौरस किमी इतके आहे. शहानुर गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास पक्की सडक असून गाडी रस्त्याने सुमारे ७ किमी इतके चढून जावे लागते. या शिवाय वेगवेगळ्या पायवाटांनी सुद्धा किल्ला चढून जाता येतो. साधारणता १००० वर्षापेक्षाही जास्त प्राचीन असलेला हा किल्ला विविध सत्ताकाळात विकसित होत गेला, थेट चालुक्य काळापासून किल्ला अस्तित्वात होता, गोंड काळात निर्मित या किल्ल्यास नरनाळा सिंग याच्या नावावरून नरनाळा हे नाव पडल्याचे संदर्भ सापडतात. किल्ल्याच्या निर्मितीनंतर या किल्ल्यावर १२ व्या ते १३ व्या शतकात देवगिरीचे यादव यांची सत्ता राहिली, पुढे देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर खिलजी, त्यानंतर बहामनी, त्यातून स्वतंत्र झालेली वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाही, पुढे मोगल, निजामशाही त्यानंतर नागपूरकर भोसले व शेवटी ब्रिटीश असा या किल्ल्यावातील सत्तेचा क्रम राहिला आहे. Camera & Gear used – 1) Video shoot with : GoPro Hero 7 & Canon Power Shot SX50HS 2) Photographs - Canon Power Shot SX50HS Music credits- YouTube Library - https://www.youtube.com/audiolibrary/... Category –Education #NarnalaFort#Narnala Sanctuary#History of Narnala Fort#Narnala Sanctuary Malghat#FortsinMelghat#Forts in Satpuda#Fortsin Vidarbha#VidarbhaTourism#Akola Dist Forts#Narnala fort History#ShahanoorFort# Explore Historical Forts and Temples, Historical and unknown places, nature & Wildlife of Vidarbha