"काव्य मैफल" भाग 13
Harshal Khairnar
0:00 / 0:00
"काव्य मैफल" भाग 13
52 просмотра · 2 недели назад
Harshal Khairnar
132 подписчика
52 просмотра · 2 недели назад
नूतन मराठा विद्यालयात काव्य मैफल उत्साहात संपन्न झाली.
आज दिनांक 09/10/2026 रोजी नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोर्डे येथे मराठी भाषेस मिळालेला "अभिजात दर्जा" सप्ताह साजरा करण्याप्रसंगी या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाची औचित्य साधून विद्यालयात एक भव्य आणि उत्साही काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मा.श्री अनुराग जगदाळे, मा.प्राचार्य , पर्यवेक्षक आदरणीय सुरेश सोनवणे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या काव्य मैफलित *प्रमुख गायक व निवेदक श्री.अनुराग जगदाळे, श्री. राकेश खैरनार,श्री.राजन पवार,श्री.अशोक पाडवी, कु.अक्षरा बेडसे यांनी सर्व उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गाजलेल्या कवितांचे सादरीकरण केलं. त्यांनी सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज, ना.धो.महानोर, बालकवी, अनंत राऊत यांच्या काव्यपंक्ती सादर करून मैफिलीत रंग भरले. संपूर्ण मैदान टाळ्यांचा गजर आणि वाह! वाह ! चा दाद देण्याने गुंजून निघाले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजन पवार यांनी केले तर आभार विद्यालयाचे मा.प्राचार्य यांनी मानले.