Перейти к содержимому

वसई ते कोकण रात्रभर प्रवास | अचानक झाली विजू दादांची भेट |#driver

Kokani gandhar

0:00 / 0:00

वसई ते कोकण रात्रभर प्रवास | अचानक झाली विजू दादांची भेट |#driver

14 801 просмотр · 15 часов назад
Kokani gandhar
12,8 тыс. подписчиков
14 801 просмотр · 15 часов назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 तर आज मी वाशीमध्ये आहे. मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये मुंबईमध्ये गाडी खाली केली होती. आता पुढचं भाडं भरायला मला वसईला जायचं होतं. साधारण दहा वाजण्याच्या दरम्यान मला वसईचं भाडं मिळालं आणि मी वसईला माल भरण्यासाठी निघालो. मुंबईचा ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकच! 😅 हळूहळू गाडी चालवत, ट्रॅफिकमधून वाट काढत जवळजवळ अडीच तासांनी मी वसईला पोहोचलो. तोपर्यंत साधारण एक वाजला होता. तिथे गाडीमध्ये माल लोड केला. माल जास्त काही नव्हता—तीन ड्रम आणि एक पेटी. गाडी जवळजवळ पूर्ण मोकळीच होती. आता पुढचं भाडं पार्लरचं होतं. साधारण तीनच्या दरम्यान मी मुंबईच्या वरळीच्या दिशेने निघालो. वरळी, हँगिंग गार्डन आणि त्यानंतर परळ अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून पार्ट लोड भरायचा होता. इकडे मला प्रचंड भूक लागली होती. 😄 जेवणाचा काही पत्ता नव्हता, म्हणून दोन केळी खाल्ली आणि सोबत कुरकुरे खाऊन पुढच्या प्रवासाला लागलो. दादरला लोकेशनवर पोहोचलो आणि तिथे अचानक आपलेच एक यूट्यूबवरचे मित्र भेटले—‘Travel With Vijay’चे विजय दादा! ❤️ विजय दादांना प्रत्यक्ष भेटून खरंच खूप भारी वाटलं. थोड्या गप्पा झाल्या, भेटीगाठी झाल्या आणि पुन्हा आपापल्या कामाला निघालो. त्यानंतर मी पार्लरचा माल भरण्यासाठी पुढे निघालो. वरळी, हँगिंग गार्डन आणि परळ अशा ठिकाणी पार्ट लोड भरत भरत शेवटी रात्री साधारण दहा-अकराच्या दरम्यान माझं लोडिंग पूर्ण झालं. हँगिंग गार्डनमध्ये ज्यांच्याकडून माल घेतला ते आपल्या गावाकडचेच होते. त्यांनी माझ्यासाठी जेवणाचीही सोय केली. दिवसभराच्या धावपळीनंतर मिळालेलं ते जेवण खरंच खूप छान वाटलं. तिथून रात्री मी हायवेच्या दिशेने निघालो आणि पनवेलला पोहोचेपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. तिथे गाडीमध्ये डिझेल फुल केलं. आता पुढे रात्रभर गाडी चालवायची होती. कुठेही जास्त न थांबता, हळूहळू गाडी चालवत मी पोलादपूरला पोहोचलो. तेव्हा सकाळचे जवळजवळ चार वाजले होते आणि डोळ्यांवर अक्षरशः झोप येत होती. म्हटलं, आता रिस्क नको. गाडी साईडला लावली, अर्धा तास डोकं टेकलं आणि एक मस्तपैकी कॉफी घेतली. ☕ त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू केला. कशेडी बोगदा क्रॉस केल्यानंतर एका मित्राचा फोन आला. योगायोग असा की तो मित्र माझ्या समोरूनच पास झाला होता. त्याच्याशी फोनवर बोलत-बोलत खेड, लोटे, चिपळूण, सावर्डे आणि त्यानंतर आरवली कधी आलं, मलाच कळलं नाही. तोपर्यंत दिवस उजाडला होता आणि आता झोपही काही येत नव्हती. आरवलीला वॉशरूम वगैरे आटोपलं आणि पुन्हा गाडी सुरू केली. कुठेही न थांबता राजापूर गाठलं. राजापूरला पोहोचल्यानंतर म्हटलं, आता नाश्ता करायलाच हवा. तिथे एक नवीनच गाडा सुरू झालेला दिसला. म्हटलं चला, इथेच नाश्ता करूया. पण त्याच्याकडे फक्त भजी आणि वडापाव एवढेच पर्याय होते. 😄 मग म्हटलं, चला… बटाटा भजी आणि पाव द्या! नाश्ता करून पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. वाटेत पुन्हा थोडी झोप यायला लागली. त्यामुळे गाडी साईडला घेतली आणि अर्धा तास शांतपणे झोपलो. झोप झाल्यानंतर फ्रेश वाटलं आणि पुन्हा प्रवास सुरू केला. साधारण दुपारी अडीच-तीनच्या दरम्यान मी घरी पोहोचलो. माल खाली केला. डिलिव्हरी सोमवारी द्यायची होती, त्यामुळे म्हटलं आता दोन दिवस आराम करूया. घरी आलो, मस्तपैकी दोन तास झोपलो. पण या पूर्ण धावपळीत एक वेगळीच अडचण झाली होती… मला अचानक खूप ताप आला आणि अंगात प्रचंड अशक्तपणा जाणवायला लागला. दिवसभराचा प्रवास, रात्रभर ड्रायव्हिंग आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तब्येत अशी बिघडली… पुढे माझ्यासोबत नेमकं काय झालं? ते जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ‘Kokani Gandhar’ परिवारात नक्की सामील व्हा. ❤️ धन्यवाद! 🙏 जय महाराष्ट्र! 🚛❤️