Перейти к содержимому

सद्गुरुची कृपा केव्हा व कशी ? - अक्कलकोट स्वामी समर्थ भक्ताची अद्भुत कथा | Sadguru Aniruddha Bapu

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

सद्गुरुची कृपा केव्हा व कशी ? - अक्कलकोट स्वामी समर्थ भक्ताची अद्भुत कथा | Sadguru Aniruddha Bapu

44 269 просмотров · 1 месяц назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
342 тыс. подписчиков
44 269 просмотров · 1 месяц назад
आषाढ महिन्यानंतर आम्हां भारतीयांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. कारण श्रावणापासून सनातन धर्मामध्ये अनेक व्रतवैकल्ये, सण, उत्सव साजरे केले जातात. मुख्य म्हणजे ह्यांतला प्रत्येक उत्सव हा आध्यात्मिकतेशी जोडलेला असतो, हे आपल्या सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे. सनातन धर्म धोक्यात असल्याची ओरड नेहमीच केली जाते. सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या पितृवचनात हा दावा अमान्य केला. सनातनधर्मावर पुरातनकाळापासून इतकी आक्रमणे झाली, तरी सनातन धर्म अजूनही टिकून राहिला आहे आणि ह्यापुढेही तो नक्कीच टिकून राहील, असे बापूंनी श्रद्धावानांना ठामपणे आश्वस्त केले आणि त्याचे अत्यंत महत्त्वाचे कारणही त्यांनी समजावून सांगितले. मात्र त्याकरिता आम्हां श्रद्धावानांचे कर्तव्य काय असायला हवे व त्या बाबतीत आमची कुठे चूक होते, तेदेखील बापूंनी अधोरेखित केले. मुख्य म्हणजे, ‘मी एकटा काय करू शकणार’ ही आपल्या मनाची गैरसमजूतही त्यांनी खोडून काढली आणि व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकजण ह्यासाठी काय करू शकतो, ह्यासंबंधी मार्गदर्शन केले. आपण भले सामान्य भक्त असू, पण जर गुरुचरणी लीन असू, तर गुरुंची ताकद आपल्यामागे कशी उभी राहते, ते स्पष्ट करणारी, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या एका भोळ्या भक्ताची कथा सद्गुरु बापूंनी पितृवचनात सांगितली. स्वामी अक्कलकोटमध्ये देहात वावरत असतानाच्या कालखंडातील ही कथा आहे. घराण्यात आजी-आजोबांपासून स्वामीभक्ती चालत आलेला हा १८-१९ वर्षांचा ‘आनंद’ नावाचा मुलगा कुटुंबाबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी मुंबईहून अक्कलकोटला निघालेला आहे. अतिशय प्रामाणिकपणे स्वामीभक्ती करणार्‍या आनंदच्या मनात उठणारे विचार आणि अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याला येत जाणारे स्वामींचे अतर्क्य अनुभव कसे त्याच्या जीवनात अनेक अचाट गोष्टी घडवतात व अखेर त्याच्यावर स्वामींची कृपा कशी होते, हे ही कथा आम्हाला सांगते. स्वामींवर अपरंपार विश्वास असणारा हा मुलगा आणि त्याच्याबरोबरच अक्कलकोटला स्वामीदर्शनासाठी निघालेला, पण चुकीच्या भक्तीसंकल्पना मनात असलेला त्याचा समवयीन मित्र, ह्या दोघांना स्वामींचे जे वेगळे-वेगळे अनुभव येतात, त्याने ह्या कथेतून आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळते की आम्ही कोणाचा मार्ग अनुसरला पाहिजे. ह्या आनंदवर स्वामींची पारमार्थिक कृपा तर होतेच, पण पुढे त्याचा प्रपंचही सुखाचा होतो. देवाला पाहताना स्वतःला विसरून जाणे हेच महत्त्वाचे; तसेच नमस्कार केवळ चमत्काराकरिता न करता भगवंताच्या कृपेसाठी करावा; जर आपल्या अंत:करणात देव असेल तर शत्रूसुद्धा मित्र बनतो; देवाकडे काय मागायचे व कुठल्या गोष्टी आपल्याला देवापासून दूर नेतात; केवळ भगवंतच नव्हे तर भगवंताचा श्रेष्ठ भक्तसुद्धा इतरांचा उद्धार करू शकतो, ही प्रमुख तत्त्वे ही कथा अधोरेखित करते. तसेच ‘प्रेम’ व ‘मोह’ ह्यांमधील पुसट सीमारेषा ओळखली तरच माणसाला आध्यात्मिक सफलता व सांसारिक सौख्य दोन्ही कसे प्राप्त होते, ह्याकडे देखील ही कथा निर्देश करते. मुख्य म्हणजे गुरुंना ‘देव’ मानतानाही, ‘माणूस’ म्हणून त्यांची काळजी श्रद्धावानाने कशी घेतली पाहिजे, त्यासंबंधी मार्गदर्शनसुद्धा ही कथा आम्हाला करते. ह्या कथेच्या ओघा-ओघात सद्‌गुरु बापूंनी श्रद्धावानांकडून - ‘नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला अद्भुतसा हाचि ब्रह्मांडाचा पिता’ ‘ पाठीमागे पळत जा, तू गुरुमागे पळत जा, गुरुमार्गे चालत रहा, तू गुरुचा होऊनि रहा’ ‘ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हे गजर करून घेतले. #AniruddhaBapu #SwamiSamarth #akkalkotswamisamarthmaharajkijai ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------