Перейти к содержимому

Marleshwar | Linga Dongar | Marleshwar Waterfall | cinematic 4k

Trek-Diary Marathi Vlog

0:00 / 0:00

Marleshwar | Linga Dongar | Marleshwar Waterfall | cinematic 4k

11 183 просмотра · 5 л. назад
Trek-Diary Marathi Vlog
1,77 тыс. подписчиков
11 183 просмотра · 5 л. назад
Marleshwar Linga Dongar | Marleshwar | Linga Dongar मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत भगवान शिवाचे जागृत समजले जाणारे शिवलिंग आहे. जवळच बारमाही वाहणारा धबधबा आहे. सह्याद्री पर्वतरांगां मध्ये वसलेल्या संगमेश्वर तालुक्यात राकट सह्याद्रीची अनेक रूपं पाहायला मिळतात. आकाशाला गवसणी घालणारे उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने व्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात आणि अशा दुर्गम ठिकाणी वसलेला तो जटाधारी श्री मार्लेश्वर. संपूर्ण कोकणात मार्लेश्वर सारखं दुसरं ठिकाण नाही. मार्लेश्वरला गेल्यावर मंदिराजवळ असलेला पांढराशुभ्र फेसाळत पडणारा बारमाही धबधबा दिसतो. परंतु या दिसणा-या धबधब्याच्या आणखी वरती अजस्त्र असे 4 धबधबे आहेत. हे धबधबे पहायचे असतील तर या मंदिराच्या समोरचा जो उंच डोंगर आहे तो चडून वर सह्याद्रीच्या माथ्यावर जाव लागत. या डोंगराला सुध्दा धार्मिक महत्व आहे. या डोंगराच्या टोकावर शंकराच लिंग आहे. त्यामुळे या डोंगराला लिंगा डोंगर असे नाव आहे. या ठिकाणी जाण्यासाठी विस्तिर्ण अशा जंगलातुन 3 ते 4 तासाची पायपीट करून जावे लागते. या ठिकाणी जाणारी वाट चुकण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी एकट्याने जाणे टाळावे. या डोंगर माथ्यावर पोहोचताना एक निमुळती आणी अत्यंत कठीण अशी 70 अंश कोनात वर जाणारी खडतर वाट आहे. या वाटेने वर जाताना एका वेळी एकाच व्यक्तीला वर किंवा खाली जाता येते. वर जाताना या ठिकाणी रोप लावावा लागतो. माथ्यावर गेल्यावर वरून पडणारे अजस्त्र असे 4 धबधबे डोळ्याच पारण फेडतात. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी कोणाला जावयाचे असल्यास आमच्याशी अवश्य संपर्क साधावा.