Перейти к содержимому

अमरावतीचे नंदनवन चिखलदरा मधील गाविलगड किल्ल्याची थोडक्यात माहिती 1803 चे मराठा व इंग्रज याचे युद्ध

YOGESH RAYJADE Films (YRF)

0:00 / 0:00

अमरावतीचे नंदनवन चिखलदरा मधील गाविलगड किल्ल्याची थोडक्यात माहिती 1803 चे मराठा व इंग्रज याचे युद्ध

2 964 просмотра · 5 л. назад
YOGESH RAYJADE Films (YRF)
1,07 тыс. подписчиков
2 964 просмотра · 5 л. назад
गाविलगड शौर्यदिन स्मृती वंदन इ.स. १८०३ चे गाविलगडावरील इंग्रज – मराठे युद्ध जगप्रसिद्ध आहे, इंग्रज अधिकारी ऑर्थर वेलस्ली आणि नागपूरकर भोसल्यांकडून किल्लेदार बेनिसिंग यांचेत हे युद्ध झाले. आज या घटनेस तब्बल २१७ वर्षे झालीत. १८०३ ला १४ डिसेंबर च्या रात्री शिड्या लाऊन व तोफांचा मारा करून जेव्हा शार्दुल दरवाजा इंग्रजांनी सर केला तेव्हा १५ डिसेंबर ला दिल्ली दरवाज्यात निकराची लढाई झाली अन बेनिसिंगसह सर्व मातब्बर सैनिक मारल्या गेलेत, यामध्ये इंग्रज सैन्याकडील १५ जणांचा मृत्यू व ११० जन जखमी झालेत. इंग्रज सैन्य आत घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चीतांवर बेनिसिंगाच्या पत्नीसह एकूण १४ स्त्रियांनी उडया उडया घेऊन जोहार केला. किल्ला ब्रिटिशांनी जिंकला अन या किल्ल्यासह संपूर्ण वऱ्हाडावर ब्रिटीश/ निझाम सत्ता आली.स्वराज्य सेवा प्रतिष्ठान दरवर्षी किल्ल्यावर शौर्यदीनानिमित्त कार्यक्रमाचे पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करते. प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा शिवाभाऊ काळे सचिव मा प्रतीक पाथरे आणि लांबदूरवरून येणारे मावळे या कार्यक्रमात सहभागी होतात. या वर्षी श्री एकनाथ तट्टे सर यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली, -बेनिसिंगाचे शौर्य अन बलिदान आणि जोहार केलेल्या सतींच्या स्मृतीस वंदन.🙏🌷 -मु पो पीरफत्ते दरवाजा, किल्ले गाविलगड.