Перейти к содержимому

अंतरीची ज्योत ... Antarichi Jyot Shri Swami samrth dhun , श्री स्वामी समर्थ धून

Jittendra Abhyankar

0:00 / 0:00

अंतरीची ज्योत ... Antarichi Jyot Shri Swami samrth dhun , श्री स्वामी समर्थ धून

7 460 просмотров · 1 год назад
Jittendra Abhyankar
12,7 тыс. подписчиков
7 460 просмотров · 1 год назад
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित एक सांगीतिक सेवा 🙏🙏 गीतकार : डॉ. राहुल देशपांडे संगीतकार : श्री. मिलिंद गुणे गायक : श्री. जितेंद्र अभ्यंकर कोरस : सौ. भाग्यश्री अभ्यंकर , तन्वी अभ्यंकर , हेमंत वाळुंजकर आणि मिलिंद गुणे. मिक्सिंग आणि मास्टरिंग: श्री. आनंद कुऱ्हेकर. विशेष सहाय्य : श्री. अजय अत्रे ( पंचम स्टुडीओज) व्हिडिओ: मयूर हुडे श्री स्वामी समर्थ .. ब्रह्मरूप तू, नारायण तू, तूचि नीळकंठ स्थूल रूप तू, सूक्ष्म रूप तू, तूचि अनंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आदि अंतही खेळविशी रे, तुझ्या अंगणात शून्य मंडळ जाते छेदूनी, अंतरीची ज्योत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजानुबाहू करुणा सिंधू तूचि भगवंत वटवृक्षाच्या तळी अभंग एक सांजवात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चंदन कुंकूम भंडारा तू भस्म विलेपीत ओंकाराचे रूप साजिरे, सुप्त प्रवाळात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कळवळता मी दुःखाने तव पाठीवर हात बोल बोबडे जरी माझे, देशी त्या अर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जगताना मी चुकतो जरीही घेशी पदरात तुझ्या मुळे गुरू माऊली, जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जन्म मृत्यूच्या झुल्यावर का खेळविशी व्यर्थ भय ही विरते, हार ही हरते, भजता समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हरपते मन , होते उन्मन, स्मरता अवधूत अशक्य तेही करितो शक्य श्रीतारक मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पंचभूतांची आरास येथे, तुझ्या सावलीत गंगा यमुना सडा शिंपती तुझ्या अंगणात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्षत्रांची रांगोळी तुझ्या उंबऱ्यात हिरण्यगर्भ किती रांगती तुझ्या घरट्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम स्मरावे, नाम भजावे, श्रद्धेने अविरत घेई आसरा वादळ वारा , तुझ्या पदरात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवकाशाचे छत्र तूचि रे, अनाथांचा नाथ अक्कलकोटी पुण्य मिळे ते शत कोटी तीर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ©JitendraAbhyankar