उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो | चैत्र नवरात्री आरती | Ambabai Aarti l Udo Bola Udo #navratri
Mahalaxmi Music महालक्ष्मी म्युझिक
0:00 / 0:00
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो | चैत्र नवरात्री आरती | Ambabai Aarti l Udo Bola Udo #navratri
1 192 просмотра · 7 мес. назад
Mahalaxmi Music महालक्ष्मी म्युझिक
18,8 тыс. подписчиков
1 192 просмотра · 7 мес. назад
चैत्र नवरात्री विशेष उदो बोला उदो आरती | Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho | Chaitra Navaratri Aarti
🙏 जय अंबाबाई माऊली! 🙏
चैत्र नवरात्री निमित्त सादर आहे अत्यंत भक्तिमय आरती "उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो". ही सुंदर देवी आरती मनाला भक्तीभावाने भारून टाकणारी आहे. नवरात्री, देवी पूजा, आणि दररोजच्या आरतीसाठी ही आरती नक्की ऐका.
🌸 नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये अंबाबाईचे नामस्मरण केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते.
🔔 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 📲 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Credits:
⦿ Title: Udo Bola Udo Ambabai Maulicha Ho
⦿ Singer :- Shubhangii Kedar
⦿ Composer :- Chetan Garud
⦿ Lyrics :- Tradditional
⦿ Programming, Mixed and Mastered - Shreejeet Gaikwad
⦿ Label - Chetan Garud Productions Studios LLP
⦿ Produced By - Chetan Garud & Veena Garud
⦿ VFX & Edit at - Chetan Garud Productions Studios LLP
--------------------------------------------------
🎶 Song Available on ♪
YT Link : • उदो बोला उदो आरती | Udo Bola Udo Ambabai M...
Spotify : https://tinyurl.com/3d965ucd
Wynk : https://tinyurl.com/2s44af5r
Amazon Music : https://shorturl.at/awKLC
Gaana : https://shorturl.at/j2Rpy
Jiosaavn : https://tinyurl.com/mvdtj2pz
🌸🎶Lyrics:
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णु रुद्र आईचें पूजन करिती हो ।। १ ।।
द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।। २ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ।
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। ३ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो ।। ४ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो ।
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो ।। ५ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ।। ६ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो ।
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो ।
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ।। ७ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो ।। ८ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ।
आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो ।। ९ ।।
उदो बोला उदो ।। ०।।
दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। १० ।।
उदो बोला उदो ।। ०।।
#DevichiAarti #DurgeDurghatBhari #DevichiGani #lololaglaarti #udobolaudo #navratrispecial #devichiaarti