Перейти к содержимому

सुज्ञता, न्याय आणि सुसंगती | सुज्ञ व्हा, न्यायी व्हा आणि सुसंगत व्हा. #part 1

Mindof_Grey - Buddha Dhamma

0:00 / 0:00

सुज्ञता, न्याय आणि सुसंगती | सुज्ञ व्हा, न्यायी व्हा आणि सुसंगत व्हा. #part 1

52 просмотра · 10 дн. назад
Mindof_Grey - Buddha Dhamma
44 подписчика
52 просмотра · 10 дн. назад
नमो बुद्धाय, जय भीम! 🙏 आजचा विषय: चतुर्थ खंड ; भाग-३ | ४:३:७ - सुज्ञता, न्याय आणि सुसंगती (Page 282) ७. सुज्ञता, न्याय आणि सुसंगती १. सुज्ञ व्हा, न्यायी व्हा आणि सुसंगत व्हा. २. हाच बौद्ध जीवन मार्ग आहे. ३. जर तुम्हाला असा कोणी माणूस भेटला जो कोणते कार्य वर्ज्य करावे हे सुचवितो, जो तुम्हाला तुमच्या दोषाबद्दल ताडित करतो. जो बुद्धिमान आहे अशा सुज्ञ माणसाचे, जसे गुप्तधन दाखविणाऱ्याचे आपण अनुकरण करतो, तसे अनुकरण करावे, त्याचे अनुकरण करणे भल्याचे आहे. त्याचे अनुकरण करण्याने वाईट होणार नाही. ४. जो दोषासाठी ताडित करतो, शिक्षा देतो, अयोग्यापासून परावृत्त करतो तो सज्जनांना प्रिय असतो आणि दुर्जनांना अप्रिय असतो. ५. पापकर्म करणारे मित्र नसावेत. नीच माणसाशी मैत्री नसावी. पुण्यकर्म करणारे मित्र जोडावे. श्रेष्ठतम माणसाशी मैत्री असावी. ६. जो धम्मामृत पान करतो तो प्रसन्नचित्ताने सुखपूर्वक राहतो. सज्जन माणसे श्रेष्ठ पुरुषांनी उपदेशिलेल्या धम्माने आनंद पावतात. ७. पाटकर आपल्या इच्छेप्रमाणे पाणी वळवितो. बाण तयार करणारा आपल्या इच्छेप्रमाणे बाण वाकवितो. सुतार आपल्या इच्छेप्रमाणे काष्ठाला आकार देतो, तसे सुज्ञ माणसे स्वतःला घडवितात. ८. भक्कम काठाचे घर वाऱ्याने कंप पावत नाही. सुज्ञ माणसे निंदा आणि स्तुतीने विचलित होत नाहीत. हाच आहे बौद्ध जीवन मार्ग - सुज्ञ, न्यायी आणि सुसंगत व्हा! जय भीम, नमो बुद्धाय! @mindof_grey