Перейти к содержимому

कथा रेणुका मातेची / katha renuka matechi #renuka #katha #mahurgad

Pooja K Creative Videos

0:00 / 0:00

कथा रेणुका मातेची / katha renuka matechi #renuka #katha #mahurgad

166 884 просмотра · 1 год назад
Pooja K Creative Videos
9,6 тыс. подписчиков
166 884 просмотра · 1 год назад
कथा रेणुका मातेची / katha renuka matechi #renuka #katha #mahurgad नमस्कार मी पूजा नरेंद्र मढवी आज मी तुम्हाला रेणुका मातेची कथा सांगत आहे. रेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, प्रज्ञावान, चपळ आणि लाघवी होती. पुढे महर्षि अगस्ती ह्यांनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे महर्षि रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते, खडतर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते. सोबतच देवतांचे आशीर्वाद सुद्धा संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका महर्षि जमदग्नी ह्यांना पूजाअर्चेत मदत करत असे. माता रेणुका ही अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती। ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षि जमदग्नींसाठी पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती आश्रमात जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप होऊन उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि योगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ] त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रामभद्र. रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्रीविष्णु ह्यांचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात. जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही व त्यांना कडाडून विरोध केला. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी दोन वर मागितले एक म्हणजे की आपल्या आई आणि चारही भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत मागितले. त्याच क्षणी रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. आणि दुसरा वर म्हणजे आपण आपला राग कायमचा विसरून जा जमदग्नींनी मोठ्या प्रसन्न मनाने तथास्तु म्हटले महर्षि जमदग्नि ह्यांना आपल्या हातून घडलेल्या अघोर व पापी कृत्याची जाणीव झाली व ते अत्यंत दुखी होऊन पश्चाताप करू लागले. हे पाहताच देवी रेणुकेने त्यांना शांत केले. घडलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून महर्षि जमदग्नींनी आपल्या क्रोधाचा कायमचा त्याग केला. जमदग्नींच्या आश्रमात अनेक शिष्य शिकायला होते. स्वयंवरामध्ये इंद्रदेवांनी रेणुका मातेला दिलेली सर्व मनोकामना पुर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नी ऋषींनकडे होती. महिमावती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन याला कामधेनुचा मोह झाला. त्याने जमदग्नी ऋषींनकडे कामधेनू मागितली परंतू ऋषींनी नकार दिला त्यामुळे कट रचून पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. व जमदग्नी ऋषींना ठार मारले रेणुका मातेला जखमी केली. आश्रम उद्ध्वस्त केले. आणि कामधेनू हिरावून नेली. परशुराम आश्रमात आल्यावर घडलेला सर्व प्रकार पाहून सर्व शत्रियांचा विध्वंस करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली. व परशुरामांनी सहस्त्रार्जुन राजाच्या राज्यावर चाल करून सहस्त्रार्जुन राजाचा वध केला.