Перейти к содержимому

साधं, पौष्टिक आणि घरगुती चवीचं मिश्र डाळींचं वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार mix dal varan recipe

mayuri bhamare

0:00 / 0:00

साधं, पौष्टिक आणि घरगुती चवीचं मिश्र डाळींचं वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार mix dal varan recipe

331 просмотр · 1 день назад
mayuri bhamare
208 подписчиков
331 просмотр · 1 день назад
मिश्र डाळींचे वरण साहित्य मसुर दाळ -2 टेबलस्पून मुग दाळ -1.5 टेबलस्पून मटकी दाळ -2 टेबलस्पून तूर दाळ - 2 टेबलस्पून वाटाणा दाळ -2 टेबलस्पून जिरं -1 टेबलस्पून मोहरी - अर्धा टेबलस्पून कडीपत्ता -7 ते 8 पानं लसूण -3 ते 4 पाकळ्या मीठ - चवीनुसार कोथिंबीर हळद - पाव चमचा हिंग - चिमूटभर वाटाणा दाळ 20 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवायची. बाकी सर्व डाळी स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालायच्या सोबतच वाटाणा दाळ देखील घालायची. त्यामध्ये मीठ,हळद,हिंग व लसूण घालायचा,2 वाटी पाणी घालून कुकर मध्ये 5 शिट्ट्या करून दाळ शिजवून घ्यायची. दाळ चांगली शिजली की त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालायचे व व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे वरून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घालायची.थोडी हळद व मीठ सुद्धा घालायचं आणि 5 मिनिटं मंद आचेवर वरण चांगलं उकळू द्यायचं. गॅस बंद करायचं, कोथिंबीर घालायची. इथे आपलं मिश्र डाळीचं वरण तयार आहे.