Перейти к содержимому

Vivekanand Patil : भाषणं तुफान व्हायरल, MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील नेमका कोण?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Vivekanand Patil : भाषणं तुफान व्हायरल, MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील नेमका कोण?

23 144 просмотра · 2 дня назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
23 144 просмотра · 2 дня назад
#vivekanandpatil #viralvideo #mpsc #punestudentprotest पुण्यातील गजबजलेले रस्ते आज स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून निघालेत. गांजवे चौकाजवळ, लाल बहादूर शास्त्री रोडवरील एस. एम. जोशी पुलाजवळ आणि अहिल्या लायब्ररीबाहेर हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. हातात मागण्यांचे फलक, डोळ्यात भविष्याची चिंता आणि मनात व्यवस्थेविरोधात धुमसणारा राग! पण या हजारोच्या जमावातून एक असा आवाज बाहेर आला, ज्याने केवळ प्रशासनालाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडलंय. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर तुम्ही या तरुणाचे व्हिडिओ पाहिले असाल.. माईकवर ताडताड बोलणारा, नियमांचे दाखले देणारा आणि सरकारी अधिकाऱ्यांना थेट सवाल विचारणारा, शेरोशायरी करुन आंदोलकांना बांधून ठेवणारा एक तरुण! दोन-दोन, तीन-तीन तास न थांबता, हजारो विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासू, धारदार आणि शैलीदार भाषणाने एकत्र बांधून ठेवणारा हा तरुण आहे कोल्हापूरचा विवेकानंद पाटील. या आंदोलनाला राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांनी पाठिंबा दिला आहे, पण सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये विवेकानंदची तुफान चर्चा सुरू आहे. अवघ्या २४ वर्षांचा हा मुलगा महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या 'आंदोलनाचा चेहरा' कसा बनला? हा विवेकानंद पाटील नेमका कोण आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.. You may have seen videos of this young man on social media over the last few days—speaking forcefully on the mic, citing rules, questioning government officials directly, and keeping the protesters engaged with poetry! This young man, who captivates thousands of students for two to three hours without stopping through his well-researched, sharp, and stylish speeches, is Vivekanand Patil from Kolhapur. People from all walks of life, including political leaders, have supported this protest, but Vivekanand is currently creating a huge buzz on social media and in the media. How did this mere 24-year-old become the 'face of the protest' for competitive exam aspirants in Maharashtra? Let's find out who Vivekanand Patil really is through this video...