Перейти к содержимому

एसएससी बोर्डाकडून शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याचा निर्णय रद्द!दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा लवकर

Educational आणि शिक्षण

0:00 / 0:00

एसएससी बोर्डाकडून शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याचा निर्णय रद्द!दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा लवकर

108 просмотров · 6 дн. назад
Educational आणि शिक्षण
62 подписчика
108 просмотров · 6 дн. назад
एसएससी बोर्डाकडून शेवटच्या  दिवसापर्यंत अर्ज भरण्याचा निर्णय रद्द! दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा लवकर -- परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्याच्या निर्णयाला यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी वेळेत पूर्ण करण्यावर मंडळाने भर दिला आहे. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर विलंब शुल्क आकारले जाणार आहे. दरवर्षी साधारणतः १४ फेब्रुवारीपासून बारावी, तर २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होते. यंदा बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षा लवकर सुरू होणार असल्याने अर्ज भरणे, विद्यार्थी नोंदणी आणि परीक्षापूर्व तयारीसाठी मंडळाने कालमर्यादा निश्चित केली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आहे. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरल्यास प्रतिविद्यार्थी २५ रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. तर १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान अति विलंब शुल्क लागू होणार आहे. त्याचा दर प्रतिदिन ५० रुपये असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. नोंदणीचा आकडा अडीच लाखांवर... छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतून आतापर्यंत बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख २७ हजार १२१, तर दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख २७ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही परीक्षांसाठी मिळून हा आकडा २ लाख ५४ हजार ९३० इतका झाला आहे. अद्याप बारावीचे सुमारे ६५ हजार, तर दहावीचे सुमारे ६३ हजार विद्यार्थी नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विभागातील नोंदणीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. #ssc