🌙 हुंकार | मराठी अंगाईगीत | Marathi Lullaby | बाळासाठी अंगाई गीत
Rajashri Suhas Jadhav
0:00 / 0:00
🌙 हुंकार | मराठी अंगाईगीत | Marathi Lullaby | बाळासाठी अंगाई गीत
2 801 просмотр · 1 мес. назад
Rajashri Suhas Jadhav
227 подписчиков
2 801 просмотр · 1 мес. назад
🌙 हुंकार | मराठी अंगाईगीत 🌙
आईच्या मायेची ऊब, चांदण्यांनी सजलेली रात्र आणि बाळाला अलगद झोपवणारे प्रेमळ सूर… 💕
“हुंकार” हे मनाला शांत करणारे हळुवार अंगाईगीत. 👶🌙
🎵 गीतकार : सौ. राजश्री सुहास जाधव
🎶 संगीत व गायन : Suno AI
©️®️ सौ. राजश्री सुहास जाधव
@rajashriwrites
🙏 अंगाई गीत आवडले तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करून माझ्या लेखनाला नक्की साथ द्या.
💬 तुमचा अभिप्राय Comment मध्ये जरूर कळवा. 🌷
━━━━━━━━━━━━━━
🎵 हुंकार
नभातील चांदण्या आल्या गं अंगणी
घे मिटूनी सानुल्या अलगद पापणी II धृ II
कान्ह्याच्या गायीही परतल्या माघारी
घरट्यांत पिलेही झोपली सारी
गुराढोरांना त्या बांधले दावणी
घे मिटूनी सानुल्या अलगद पापणी II१II
का पाहसी सानुल्या इकडेतिकडे?
झोप माझ्या बाळाची गेली कुणीकडे ?
तुला जोजविण्या दरवळली रातराणी
घे मिटूनी सानुल्या अलगद पापणी II२II
तो पहा चांदोबाही झोपी गेला!
अंगावरी पांघरला निशेचा शेला
झोप दाटली बघ तुझ्या लोचनी!
घे मिटूनी सानुल्या अलगद पापणी II ३II
भरू नकोस हुंकार बाळा
निद्राराणी खुणाविते डोळा
भूल पडावी तुजला माझ्या सुरांनी
घे मिटूनी सानुल्या अलगद पापणी II४II
━━━━━━━━━━━━━━
सौ. राजश्री सुहास जाधव.©️®️
@rajashriwrites
#हुंकार #अंगाईगीत #मराठीअंगाईगीत #मराठीगीत #मराठीगाणी #MarathiLullaby #MarathiSong #rajashriwrites