झाले बदनाम देवा तुझे पायी | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण गवळण | अवश्य व्हिडिओ पहा |
eknath music melody
0:00 / 0:00
झाले बदनाम देवा तुझे पायी | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण गवळण | अवश्य व्हिडिओ पहा |
87 020 просмотров · 1 год назад
eknath music melody
36,3 тыс. подписчиков
87 020 просмотров · 1 год назад
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || धृ ||
भर झोपेतून दचकून उठते
मूर्ती सावळी समोर दिसते
सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || १ ||
शिरी घेऊन गोरस माठ
हळूहळू चढते मथुरेचा घाट
या या कृष्णाला सांगावं काही
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || २ ||
एका जनार्दनी विनविते राधा
कृष्णा तू लागू नको आमूच्या नादा
सासू-सासऱ्यांचा जाच मला भारी
चित्त संसारी लागत नाही
झाले बदनाम देवा तुझ्या पायी
चित्त संसारी लागत नाही || ३ ||