Перейти к содержимому

नवरात्रीची पूजा झाली अन् समोर जे दिसलं ते पाहून धक्काच बसला! 😳

Pallavi's डेली vlog😊

0:00 / 0:00

नवरात्रीची पूजा झाली अन् समोर जे दिसलं ते पाहून धक्काच बसला! 😳

142 340 просмотров · 10 часов назад
Pallavi's डेली vlog😊
209 тыс. подписчиков
142 340 просмотров · 10 часов назад
🤍🌼 नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा शुभ रंग पांढरा! 🌼🤍 आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीची अगदी मनोभावे पूजा केली. पांढऱ्या रंगाची फुलं, पांढरी रांगोळी आणि प्रसन्न वातावरणात देवीची पूजा करताना मनाला खूप छान वाटलं. 🙏❤️ आमच्याकडे नवरात्रीमध्ये तरवडाच्या फुलांच्या माळांना खूप मान आहे. त्यामुळे शेतात जाऊन तरवडाची फुलं आणली आणि देवीच्या पूजेसाठी त्यांचा वापर केला. 🌼 पण आजच्या दिवसात आणखी काही अनपेक्षित प्रसंग घडले! 😱 घराच्या बाजूच्या कॅनलमध्ये एका मोठ्या धामणीने बेडूक पकडला होता. तो प्रसंगही कॅमेऱ्यात टिपला. त्यानंतर घरात एक चिमणी आली आणि खिडक्या-दरवाजे उघडे ठेवूनही तिला बाहेर जायचा रस्ता सापडेना. तिच्या मागे फिरता फिरता माझी तर चक्कर यायची वेळ आली! 😂🐦 आजच्या या नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये पूजा, शेतातील फुलं आणि आमच्या घरात घडलेले हे मजेशीर व अनपेक्षित प्रसंग नक्की पाहा. तुम्हाला आजची देवीची पूजा कशी वाटली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️🙏 व्हिडिओ आवडला तर LIKE करा, आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करा आणि आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच करत राहा. 🥰 🌺 तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺 #Navratri #NavratriDay2 #WhiteColor #NavratriPuja #नवरात्र #नवरात्रीचादुसरादिवस #देवीचीपूजा #तरवडाचीफुलं #MarathiVlog #PallaviDailyVlog #VillageVlog #DailyVlog #MarathiYouTuber #NavratriSpecial