Перейти к содержимому

संताजी घोरपडेच्या हत्येस जबाबदार कोण ? राजाराम महाराज,राधाबाई की अमृतराव ? Santaji Ghorpade |

Patil's Opinion

0:00 / 0:00

संताजी घोरपडेच्या हत्येस जबाबदार कोण ? राजाराम महाराज,राधाबाई की अमृतराव ? Santaji Ghorpade |

1 611 просмотров · 12 часов назад
Patil's Opinion
195 тыс. подписчиков
1 611 просмотров · 12 часов назад
#patilsopinion #santajighorpade #shivajimaharaj संताजी घोरपडेच्या हत्येस जबाबदार कोण ? राजाराम महाराज,राधाबाई की अमृतराव ? Santaji Ghorpade |    • संताजी घोरपडेच्या हत्येस जबाबदार कोण ? राज...   Description of the video - छत्रपती संभाजी महाराजांची कृतीने हत्या झाली आणि स्वराज्याची घडी विस्कटली. औरंगजेबाच्या सांगण्यावरून जुल्फी कारखानाने रायगडाला वेढा दिला. महाराणी येसूबाई आणि बाळराजे शाहू कैद झाले. स्वराज्याचा छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे पडून गेला. स्वराज्यातील सैनिकांचे मराठ्यांचे आत्मबळ खचले. जनता भयभीत झाली. अशा अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये स्वराज्याला सुरक्षित ठेवण्याचे काम सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केले. सोबतीला धनाजी जाधव होतेच. राजाराम महाराज जरी जिंजीला गेले असले तरी त्यांनी तिथे मराठ्यांचा फौज फाटा उभारायला सुरुवात केली होती. काही महिन्यातच त्यांनी एक लाख मराठे संतजिच्या मदतीसाठी पाठवले. संताजींनी ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्याला अबाद ठेवण्याचे काम केले. संताजीच्या संरक्षणाखाली औरंगजेब स्वराज्य मध्ये अजिबातच घुसू शकला नाही. धनाजी जाधव यांचाही पराक्रम संताजीच्या बरोबरीचा होता. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा स्वराज्यासाठी सरसेनापती पद खालीच होते. स्वराज्यला सरसेनापती पद आवश्यक आहे. पण संताजी की धनाजी हा पेच राजाराम महाराजांच्या समोर होता. राजाराम महाराजांची इच्छा धनाजी जाधव यांना सरसेनापती बनवायची होती. धनाजी जाधव शूरवीर तर होतेच पण समजदार समंजस आणि संयमी होते. याउलट संताजी घोरपडे अतिशय शूरवीर होतेच पण सोबतच तामसी तापट आणि रागीट होते. स्वराज्याच्या पडत्या काळामध्ये दोघांनीही स्वराज्याला सावरले होते. पण स्वराज्यातील जनतेला स्वराज्याच्या मराठ्यांना प्रेमळपणे सावरण्याचे काम धनाजीच करू शकते हा विश्वास राजारामांना होता. संताची घोरपडेंची सतत धुसफुस चालत होती. धनाजी जाधवांपेक्षा माझे कार्य श्रेष्ठ असून मला नेहमीच झुकतमाप दिले जाते असा त्यांचा आरोप होता. परिणामतः संताजी घोरपडे राजाराम महाराजांपासून दूर होत चालले होते. कालांतराने संताजी घोरपडे आणि राजाराम महाराजांमध्ये खूप वाद झाले. त्यामुळे संताजी घोरपडे राजाराम महाराजांपासून वेगळे झाले. तरी स्वराज्य रक्षणाची निष्ठा त्यांची कमी झाली नव्हती. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गद्दार झालेल्या मराठ्यांना सुद्धा राजाराम महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतले होते. त्यामध्ये नागोजी माने व त्याचा मेव्हणा अमृतराव निंबाळकर हे होते. या कारणामुळे संताजीचा स्वाभिमान दुखावल्या जात होता. कालांतराने संताजी एकटे पडत गेले. एका महत्त्वाच्या लढाईमध्ये संताजींनी नागोजी मानेच्या मेव्हण्यास म्हणजे अमृतराव निंबाळकरस हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. त्यानंतर संताजीला ठार मारून आपल्या मेव्हण्याचा बदला घ्यावा अशी नागोजी मानेला वाटत होते. त्याला पाठबळ खुद्द राजाराम महाराजांचे होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी पडत्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा ही न करता, औरंगजेबाच्या अनेक नामांकित सरदाराला धूळ चालणारा संताजी त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात एकटा पडला होता. संताची घोरपडे च्या वाट्याला आलेली ही शोकांतिका राजाराम महाराजांमुळे आली की खुद्द संताजी मुळेच याविषयीचे सविस्तर वर्णन प्रस्तुत व्हिडिओमध्ये केलेला आहे. संदर्भ ग्रंथ - सेनापती संताजी घोरपडे लेखक - डॉ . जयसिंगराव पवार मात्र पुढे संताजी घोरपडे आणि राजाराम महाराज यांच्यात मतभेद वाढत गेले. संताजींचा स्वाभिमान, त्यांचा तापट स्वभाव, धनाजी जाधवांशी असलेली स्पर्धा आणि राजाराम महाराजांनी काही पूर्वीच्या विरोधकांना पुन्हा स्वराज्यात सामावून घेतल्याने निर्माण झालेला तणाव—या सर्व घटनांचा परिणाम संताजींच्या आयुष्यावर झाला. नागोजी माने, अमृतराव निंबाळकर आणि संताजी घोरपडे यांच्यातील संघर्षाने या शोकांतिकेला वेगळे वळण दिले. पण प्रश्न असा आहे— संताजी घोरपडेंच्या आयुष्याची ही शोकांतिका नेमकी कुणामुळे घडली? राजाराम महाराजांचे निर्णय कारणीभूत होते? की संताजींचा स्वभाव आणि त्यांचे निर्णय? की या दोन्ही गोष्टींचा परिणाम झाला? या व्हिडिओमध्ये उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे संताजी घोरपडे यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातील घटनांचा सविस्तर आढावा घेतला आहे. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करा. #संताजीघोरपडे #राजाराममहाराज #मराठाइतिहास #स्वराज्य #छत्रपतीशिवाजीमहाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #धनाजीजाधव #औरंगजेब #मराठाइतिहास