गणेश चतुर्थीला ही केळ्याची मुळुकं नक्की करून बघा 😋 Banana Fritters
Aye Narayan
0:00 / 0:00
गणेश चतुर्थीला ही केळ्याची मुळुकं नक्की करून बघा 😋 Banana Fritters
661 просмотр · 10 дней назад
Aye Narayan
153 подписчика
661 просмотр · 10 дней назад
Sharing very easy and unique recipe of banana fritters that is called केळ्याची मुळुकं in Konkani. Try this delicious traditional recipe for coming Ganesh Chaturthi 😊
केळ्याची मुळुकं हा श्रावणात आणि गणेश चतुर्थीला बनवला जाणारा एक अतिशय सोपा आणि सुंदर पारंपरिक पदार्थ आहे. येत्या सणाच्या दिवसांत नक्की करून पहा 😊
Full Recipe 👇🏻
Crispy from the outside, soft inside; these cute little Banana Fritters from Konkan are a must try! 😋
केळ्याची मुळुकं (कोकणी केळ्याचे भजी)
पिकलेली केळी: २
रवा: १ कप
दूध: १ कप
ओला नारळ (खवलेला): १/२ कप
साखर: 3 ते 4 मोठे चमचे
काजूचे तुकडे: २ मोठे चमचे
तेल तळण्यासाठी
कृती:
1. एका मोठ्या बाऊलमध्ये २ पिकलेली केळी घेऊन ती हाताने किंवा काट्याचमच्याने (fork) चांगली मॅश करून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत.
2. मॅश केलेल्या केळ्यामध्ये साखर, खवलेला ओला नारळ, काजूचे तुकडे, दूध घालून सर्व एकत्र नीट मिक्स करा.
3. आता या मिश्रणात १ कप रवा घालून चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. हे पीठ मऊसर गोळ्यासारखे दिसेल.
4. बाऊलवर झाकण ठेवून हे पीठ अर्धा तास (३० मिनिटे) बाजूला ठेवून द्या, जेणेकरून रवा केळ्यातील आणि साखरेतील ओलावा शोषून छान फुलेल.
5. अर्ध्या तासानंतर पीठ पुन्हा एकदा हलवून घ्या. कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर हाताने किंवा चमच्याने पिठाचे छोटे-छोटे गोळे (भजीसारखे) तेलात सोडा.
6. गॅसची आच मध्यम ठेवून हे मुळीक दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन (सोनेरी रंगावर) आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
7. गरमागरम किंवा थंड झाल्यावर चहासोबत खायला द्या!
Recipe in English
Kele Muluk (Konkani Sweet Banana Fritters)
Ingredients:
Ripe Bananas: 2 (over-ripe bananas work best)
Semolina (Rava): 1 cup
*Milk - 1 Cup
Fresh Grated Coconut: 1/2 cup
Sugar: 4-5 tbsp (adjust to preference)
Cashew Pieces: 2 tbsp
Oil or Ghee: For deep frying.
Instructions:
1. In a mixing bowl, peel and thoroughly mash the 2 ripe bananas using a fork or your hands until smooth and lump-free.
2. Add the sugar, fresh grated coconut, cashew pieces, milk to the mashed bananas. Stir well until the sugar begins to dissolve.
3. Gradually add 1 cup of rava (semolina) into the mixture. Mix thoroughly to create a soft, dropping-consistency, dollopy batter.
4. Cover the bowl with a lid and let the batter rest for half an hour. This allows the rava to absorb the moisture and puff up beautifully.
5. Heat oil or ghee in a kadai on medium heat. Once hot, drop small spoonfuls (or lemon-sized portions using your fingers) of the batter gently into the oil.
6. Fry them on medium-low flame.
#Konkan #Konkanifood #BananaRecipes #fritters #banana #easyrecipe #tasty #fried #sweet #ayenarayan