आळंदीचे दत्तगुरु श्रीनरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज । Alandiche Dattaguru Narasimha Saraswati swami
Tales of Saints
0:00 / 0:00
आळंदीचे दत्तगुरु श्रीनरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज । Alandiche Dattaguru Narasimha Saraswati swami
4 933 просмотра · 8 месяцев назад
Tales of Saints
34 тыс. подписчиков
4 933 просмотра · 8 месяцев назад
श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज
आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर जवळच गोपाळपुऱ्यात श्री नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचे समाधि मंदिर आहे. पौष शु. १५ शके १८०७ मध्ये (इ.स. २० जाने.१८८६) श्री नरसिंव्हसरस्वती- स्वामी महाराजांनी येथे समाधि घेतली. ही समाधि योगशास्त्रानुसार आहे. फार प्राचीन काळापासून आळंदी हे स्थान एक प्रख्यात शैव स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सिद्धेश्वराचे शिव मंदिर असून इंद्रायणी नदीवरील सिद्ध बेटात ८४ सिद्धांची स्थाने आहेत. येथे इंद्रायणी उत्तरवाहिनी झाली असून या उत्तरवाहिनी झालेल्या इंद्रायणीच्या तीरावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज यांचे समाधिस्थान आहे. जेव्हा नदी उत्तरवाहिनी होते तेव्हा त्या नदीला गंगेचे पावित्र्य लाभते आणि योग परंपरा असे मानते की उत्तरवाहिनी असलेली नदी व तिच्यावरील उत्तर दिशा हे योग्यांचे मोठे पीठ असते. या परंपरेला अनुसरून श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज यांनी येथे शके १८०७ पौष शुद्ध पौर्णिमेला समाधि घेतली. हे समाधिस्थान आज श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज मंदिर या नावाने प्रख्यात असले तरी या समाधिस्थानाचे दुसरे एक असामान्य वैशिष्ट्य आहे ते हे की इंद्रायणी नदीला केव्हढाही जरी पूर आला तरी नदीच्या पाण्याचा उपसर्ग जसा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिस्थानाला होत नाही तसाच श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांच्या समाधिस्थानालाही होत नाही. खुद्द श्री ज्ञानेश्वर महाराज समाधिजवळ सुप्रसिद्ध नाथ पंथीयांची समाधिस्थाने आहेत. त्याच प्रमाणे या इंद्रायणीच्या उत्तर तीरावर अनेक सत्पुरुषांची समाधिस्थाने आहेत. या सर्व समाधिस्थानांवर वर वर जरी नजर टाकली तरी ही सर्व समाधिस्थाने इंद्रायणीच्या उत्तर दिशेला आहेत हे दिसून येईल. आणि म्हणून जेव्हा श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी समाधि घेण्याचे ठरिवले तेव्हा त्यांनी इंद्रायणीच्या उत्तर तीरावरील समाधिस्थान ठरवले व त्यानुसार समाधि घेतली. हे सर्व भारतीय योगशास्त्र परंपरेच्या दृष्टीने सुसंगत आहे. वेगळ्या भाषेत समाधिस्थान निवडण्यामागे योगशास्त्र परंपरेची भरभक्कम बैठक आहे. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज इ.स. १८७३ मध्ये आळंदीला आले. तत्पूर्वी त्यांनी विदर्भ मराठवाडा व महाराष्ट्र प्रदेशात भरपूर भ्रमण केले. इ.स.१८७३ मध्ये महाराज जेव्हा आळंदीला आले तेव्हा आळंदी क्षेत्राची परिस्थिती आगळी वेगळी होती. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आहे तेव्हा वारकरी संप्रदायात बराच सुस्तपणा आलेला होता. आळंदीला आल्यावर श्री महाराजांचा असा नियम असे की ते श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शन करीत. त्यावेळी त्यांचे वास्तव्य मंदिराला लागून असलेल्या श्री चंक्रांकितबुवांच्या माडीवर होते. श्रीगुरुमहाराजांनी वारकरी संप्रदायात फार मोठे योगदान दिले. त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिमागे मुक्ताबाईंचा सभामंडप उभा केला. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथ त्यांनी निर्माण करून रथयात्रा व गाव प्रदक्षिणा सुरू केली. श्री ज्ञानेश्वर मंदिरात ते नेहमीच भजन करीत असत, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीवर प्रवचनही करीत. जे कोणी त्यांच्या प्रवचनाला असत ते मोठे भाग्यवान होते. आळंदीला अवघी १२ वर्षे वास्तव्य होते. परंतु या १२ वर्षांत त्यांनी जे धर्मकार्य केले त्याला तोड नाही. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांमुळे दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदाय ह्यांच्यात जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित झाले. आळंदीला येण्यापूर्वी श्रीगुरु महाराजांचे वास्तव्य कांही काळ पंढरपूरला होते, ते स्थान व्यास मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्री महाराजांच्या शिष्यवर्गात कांही बडवे मंडळी होती. तसेच अंमळनेरकर महाराज हे श्री महाराजांच्या समकालीन होते. एकदा असे झाले की एका बैराग्याने रागाच्या भरात पांडुरंगाच्या पायाला इजा केली तेव्हा श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी झाडपाला लावून पांडुरंगाच्या पायाची जखम बरी केली. कारण श्री महाराजांच्या दृष्टीने पांडुरंग ही कांही मूर्ति नाही, तो साक्षात पांडुरंग आहे आणि म्हणून पांडुरंगाच्या पायाला इजा केली हे पाहून श्री महाराज फार व्यिथत झाले आणि त्यांच्या पायाची जखम बरी केली. त्यावेळी तेथे अंमळनेरकर महाराज होते. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी लिहिलेले ॥श्री ज्ञानेश्वर अष्टक॥ हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे स्तवन आहे. ज्ञानेश्वर हा साक्षात् विष्णु आहे असे श्री महाराज म्हणत. जेव्हा ………………….. यांनी श्री महाराजांचे चरित्र लिहिले तेव्हा – विष्णुरूप ज्ञानेश्वरापेक्षा माझे गुण गातोस, हे योग्य नाही – असे श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट बजावले. ज्ञानेश्वर हा साक्षात विष्णु आहे आणि या महाविष्णुचे स्तवन श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी ॥श्री ज्ञानेश्वर अष्टकात ॥ केले आहे. येथे साक्षात दत्तात्रेय श्री महाराजरूपाने श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णुचे स्तवन करीत आहेत. ज्ञानेश्वर हा अवतार पांडुरंग असा आहे व पांडुरंग रूपात तो आळंदीला शैव क्षेत्रात समाधिस्थ झालेला आहे. शैव क्षेत्रात विष्णु समाधि घेतो आणि श्री महाराज त्यांचे स्तवन करतात असे भारताचे धर्मोतिहासतील अलौकिक दृष्य आपल्याला येथे प्रत्ययाला येते.