Kopineshwar Ashtak Paramparik chaal(Kaupineshwar Mandir Thane) Kedar Pandit# Sanjiv Kokil#khakigulab
sanjiv kokil
0:00 / 0:00
Kopineshwar Ashtak Paramparik chaal(Kaupineshwar Mandir Thane) Kedar Pandit# Sanjiv Kokil#khakigulab
9 028 просмотров · 2 г. назад
sanjiv kokil
6,75 тыс. подписчиков
9 028 просмотров · 2 г. назад
समर्पित: श्री कौपिनेश्वर महादेव मंदिर..ठाणे.
एक, ऐतिहासिक ,पुरातन सिद्ध
मंदिर.
याचा स्पष्ट उल्लेख ,भृगुसंहितेत
आहे.... संजीव कोकीळ.
गीत संहिता.... श्री दत्त दास विरचित.
"कौपिनेश्वर अष्टक"
पार्वती वरा.. चंद्रशेखरा.. हर महेश्वरा.. शंभू शंकरा.करुनिया त्वरा दास उद्धरा ..वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा....१
नीललोहिता.. भाल लोचना.. नागभूषणा मदन मर्दना.
पार भव नदी.. मधून मज करा. वंदितो तुम्हा कौपिनेश्वरा....२
भक्तवत्सला...भस्म मंडिता , राघव प्रिया.. रावण सतुता. त्रिविध यातना दुस्सहा हरा... वंदितो तुम्हा ...कौपिनेश्वरा...३
गौरी वल्लभा..पंक्ती लोचना . स्वर्धुनी धरा.. गर विभूषणा. शोषि मम विभो संसृतीगरा .वंदितो तुम्हा कौपिनेश्वरा...४
दक्ष मदहरा ...वृषभ वाहना .रामप्रियकरा त्रिपुर भंजना. करुनिया कृपा, मोह तम हरा... वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा...५
विकट विग्रहा.. पंचकंधरा.. अंबिकाधवा शंभूशिवहरा. तवपदी मला देई आसरा.. वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा.....६
सत्यजिद् घना...सगुनण निर्गुणा. विश्व पालका विश्व कारणा..लोल मन्मना ..त्वरित आवरा.
वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा...७
दारी तव उभा.. दीन दास हा.पतितपावना , त्याकडे पहा.ने पदी तया,धरूनीया करा..
वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा....८
नित्य गात जो अष्टकास या...जगती मुक्ती दे भुक्ति ही त्या.दत्तदास या मागतो वरा.वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा....९