श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर शिरोळ || Dattguru Bhojanpatra Mandir Shirol Kolhapur @TirthaaVaibhav
Tirthaa Vaibhav
0:00 / 0:00
श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर शिरोळ || Dattguru Bhojanpatra Mandir Shirol Kolhapur @TirthaaVaibhav
9 077 просмотров · 1 год назад
Tirthaa Vaibhav
2,61 тыс. подписчиков
9 077 просмотров · 1 год назад
श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदिर शिरोळ || Dattguru Bhojanpatra Mandir Shirol Kolhapur
कोल्हापूरातल्या शिरोळ तालुक्यात दत्त महाराजांचे अनंत काळ वास्तव्य होतं. नृसिहवाडी हे ठिकाणही त्यापैकीच एक. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरोळची भूमी देवभूमी म्हणूनच ओळखली जाते. दत्त गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी करणाऱ्या अनेकांना नृसिहवाडी माहिती आहे. पण, तिथून जवळच असलेल्या दत्त गुरूंच्या भोजनपात्र मंदिराविषयी फार कमी माहिती आहे.
दत्त पुराणातील गुरूचरित्रात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. शिरोळच्या नृसिहवाडी मंदिरापासून ६ किमी अंतरावर हे मंदिर आहे. तिथे असलेल्या एका गंगाधर नामक ब्राह्मणाच्या दारात दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी गेले. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले. त्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना पाय धुवायला पाणी दिले.
घरात केवळ जोंधळ्याच्या कण्या शिजलेल्या होत्या. पण, त्या वाढायच्या कशावर या गोंधळात ती माऊली पडली होती. कारण, घरात काही भांडी शिल्लक नव्हती. तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला.
तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या. त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनूसार दगावरच कण्या वाढल्या. महाराजांनीही अगदी मिटक्या मारत चवीने त्या खाल्ल्या. घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती. त्या बोटांचे व महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंक, चक्र, पद्य चिन्हे दगडावर उमटली.
महाराजांनी कण्या खाल्ल्या आणि ते अदृश्य झाले. त्या शिळेवर महाराजांची पाच बोटे आणि चिन्हे आजही त्या पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. हा काळ शके १३६४ ते १३७६ चा तेव्हा पासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. याकाणी श्री नृहसिंह सरस्वती स्वामींनी माध्यांन काळी भोजन केले. म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात.
सर्वेश कुलकर्णी - ९५१८३२०५१२
📌 व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights):
🚩 गुरुचरित्रातील उल्लेखावर आधारित श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे पावन स्थान
🛕 ५०० वर्षांहून अधिक जुना इतिहास आणि नृसिंहवाडीजवळील गुप्त देवस्थान
🥛 पाषाणावर दुधाचा अभिषेक केल्यावर दिसणारे दत्त महाराजांच्या बोटांचे ठसे व चिन्हे
🌾 जोंधळ्याच्या कण्यांच्या भिक्षेची आणि गंगाधर ब्राह्मणाची आख्यायिका
📍 नृसिंहवाडीपासून (नरसोबाची वाडी) अवघ्या ६ किमी अंतरावर रस्ता
📞 संपर्क व माहिती (Contact Details):
सर्वेश कुलकर्णी: ९५१८३२०५१२
🗺️ येथे कसे पोहचावे? (How to Reach):
स्थान: शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.
अंतराचा अंदाज: नृसिंहवाडीपासून ६ किमी | सांगली शहरापासून १५ किमी | कोल्हापूर शहरापासून ४५ किमी.
वाहतूक: नृसिंहवाडी किंवा शिरोळवरून स्थानिक रिक्षा आणि खासगी वाहने सहज उपलब्ध होतात.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#BhojanpatraMandir #Shirol #KolhapurTourism #Nursinhwadi #Dattaguru #Gurucharitra #Dattatreya #KolhapurDiaries #DattaParampara #TirthVaibhav
#दत्तदिगंबर
#दत्तात्रेय
#भोजनपात्र
#दत्तगुरु
#shirol
#शिरोळ
#kolhapur
#कोल्हापूर
#शिवाजीमहाराज
#shivajimaharaj
#tararani
#chatrapatishivajimaharaj
#chatrapati
#sambhajimaharaj
#छत्रपती
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#महाराणी_ताराराणी
#ताराराणी
#शाहूमहाराज
#मराठाइतिहास
#narsobachiwadi
#Nursinhwadi
#nursinhawadi
#नरसोबाचीवाडी
#नृसिंहवाडी