इथंच राहिला होता आपला विठुराया (भाग - १) | Hampi | | Vitthal |
DnyanbaTukaram
0:00 / 0:00
इथंच राहिला होता आपला विठुराया (भाग - १) | Hampi | | Vitthal |
1 285 просмотров · 2 года назад
DnyanbaTukaram
10,8 тыс. подписчиков
1 285 просмотров · 2 года назад
इथंच राहिला होता आपला विठुराया
कर्नाटकातील हंपी अर्थात विजयनगर म्हणजे, मध्ययुगातील वैभवशाली साम्राज्य. येथील राजा कृष्णदेवराय याने पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची मूर्ती आणून येथील भव्य मंदिरात तिची स्थापना केली होती, अशी कथा आहे.
पैठणचे संत भानुदास यांनी कृष्णदेवराय याच्याकडून आणून पुन्हा पंढरपुरात प्रतिष्ठापित केली, असे उल्लेख संत चरित्रांमध्ये आढळतात.
खरं तर कर्नाटक किंवा दक्षिण भारतात विठ्ठलभक्तीची परंपरा फार जुनी आहे. त्या माध्यमातून संतांनी महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या उभय प्रदेशांतील नातं घट्ट केलं आहे. हंपीतील विठ्ठल मंदिर हे याच नात्याचा पुरावा आहे.
आम्ही ||ज्ञानबातुकाराम|| वार्षिकातर्फे यंदा संत एकनाथ महाराज विशेषांक करत आहोत. संत भानुदास महाराज हे एकनाथ महाराजांचे आजोबा. त्यामुळं त्यांच्या चरित्रातील श्री विठ्ठलाच्या कथेचा मागोवा घेणं क्रमप्राप्तच. त्यासाठीच आम्ही धडकलो थेट हंपीमध्ये. श्री विठ्ठलाच्या मंदिरात. तेथूनच हा व्हिडिओ रिपोर्ट (भाग - १) खास तुमच्यासाठी.
व्हिडिओ : नरेंद्र साठे
#ज्ञानबातुकाराम #marathi #हंपी #dnyanobamauli #विठ्ठल #विठ्ठलदर्शन #vitthalmandir #hampi #karnataka #karnatakatourism #mandir