Rahul Giri ('Ignited Minds!' - पाचवा 'प्रज्वलित तरुण' : राहुल गिरी, बीड.)
YUVA मन्वंतर!
0:00 / 0:00
Rahul Giri ('Ignited Minds!' - पाचवा 'प्रज्वलित तरुण' : राहुल गिरी, बीड.)
7 500 просмотров · 5 лет назад
YUVA मन्वंतर!
4,67 тыс. подписчиков
7 500 просмотров · 5 лет назад
नमस्कार!
तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह,ऊर्जा अन् सारे अवकाश कवेत घेण्याची महत्त्वाकांक्षा. या उत्साह,उर्मी आणि उर्जेच्या बळावर प्रत्येक काळातील तरुण पिढीच्या हातून काही सृजनात्मक घडत असते,नवनिर्मिती होत असते..
स्वामी विवेकानंद म्हणायचे, "तुमच्या देशातील तरुणाईच्या ओठांवर कोणतं गाणं आहे,हे सांगा;मी तुमच्या देशाचं भविष्य सांगेन..!"
तरुणाईच्या मनात जे धुमसत असतं,ते गाणं म्हणून त्यांच्या ओठांवर येतं...
सहसा आपल्या लक्षात येत नाही,पण आपल्या सभोवतालच्या जगात अपरिमित उत्साह घेऊन ही 'उर्जेची बेटं' वावरत असतात.
कुणी लेखक म्हणून शब्दांतून व्यक्त होत असतं तर कुणी कवी म्हणून रसिकांच्या मनावर गारुड करत असतं.कुणी पत्रकार म्हणून 'दुर्लक्षित जनसामान्यां'च्या प्रश्नांना वाचा फोडत असतं तर कुणी लघुउद्योजक म्हणून नव्या निर्माणाची धडपड करत असतं,कुणी डॉक्टर म्हणून समाजाच्या आरोग्याची चिंता वाहत असतं तर कुणी अभियंता म्हणून रचनात्मक उभारणीच्या कामात गढून गेलेलं असतं.कुणी शिक्षक /प्राध्यापक म्हणून विद्यार्थी जीवनाला आकार देत असतं तर कुणी संशोधक म्हणून व्यासंगाच्या महासागरात मुशाफिरी करत असतं,कुणी आपल्या चिंतनशील भाषण/प्रवचनाच्या माध्यमातून लोकमानस घडवत असतं तर कुणी स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने पूर्वतयारी करत नव्या प्रशासनाची परिभाषा तयार करत असतं..
खरंतर अशा या तरुणाईचा संघर्ष,यश,कर्तृत्व सारंच प्रेरणादायी असतं;पण आपण 'उथळ पाण्याला खळखळाट फार' असे त्यांचे सदोष मूल्यमापन करत एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो,नाहीतर त्यांना अनुल्लेखाने मारतो.
टीका करायची असली तरी हरकत नाही;पण निदान त्यांच्या मनात काय खळबळ चालू आहे,हे समजून घेणे आवश्यक नाही का?
तरुणाईच्या मनातील 'चिंता आणि चिंतन' सगळ्यांच्या समोर यावे या हेतूने 'युवा मन्वंतर' आणि 'कल्पक विद्यार्थी समूह' यांच्या संयुक्त विद्यमाने:
“Youth from different kinds...
But all have 'Ignited Minds!"
या भावनेतून 'IGNITED MINDS' हा आगळावेगळा उपक्रम आम्ही 'युवा मन्वंतर' या तरुणाईच्या डिजिटल कट्टयावर
राबवत आहोत.
या उपक्रमातील पाचवा 'प्रज्वलित तरुण' आहे:
राहुल गिरी, बीड.
आहेर वाहेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड हे राहुलचं मूळ गाव. सर्वसामान्य शेतकरी आणि ऊसतोड मजूरी करणाऱ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला.
प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण गावापासून पाच किलोमिटरच्या अंतरावरील पाडळसिंगी येथे पूर्ण केले. शिक्षण घेण्याची जिद्द असल्याने दररोजची पाच किलोमीटरची पायपीट राहुलला कधीही कंटाळवाणी वाटली नाही. म्हणून तर दहावीला ९१% आणि बारावीला ८०% गुणांच्या गुणवत्तेसह तो उत्तीर्ण झाला.
पंचक्रोशीत होणारी कीर्तन-प्रवचने आणि राजकीय कार्यक्रम यामुळे लहान वयातच त्याचा 'कान' तयार झाला. बोलण्याची आवडही निर्माण झाली. लहान सहान कार्यक्रमात व्यक्त व्हायला ही त्याला आवडू लागले; परंतु त्याच्या वक्तृत्वाला धार आणि व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचे काम बलभीम महाविद्यालयातील भारावलेल्या वातावरणाने केले.
'बलभीम' मधील तीन वर्षांच्या काळात एकीकडे त्याची वाचनाची आवड वृद्धिंगत होत गेली तर दुसरीकडे अभ्यासाच्या आधारे कसे अभिव्यक्त व्हावे, याचे संस्कार त्याच्या वक्तृत्वावर झाले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते यांची राहुलच्या या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका राहिली.
या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्रभरातील अनेक वक्तृत्व, वाद-विवाद, काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धेत त्याने शेकडो पारितोषिके मिळवली.
आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव,महाराष्ट्र शासनाची 'स्वच्छता मित्र करंडक' वक्तृत्व स्पर्धा आणि 'मराठवाड्याचा युवावक्ता' अशा मानाच्या स्पर्धा जिंकून त्याने आपले वक्तृत्वाचे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले.
स्वतःला केवळ वक्तृत्व स्पर्धांपुरते सीमित न ठेवता तो सध्या पुणे येथील नामांकित 'कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस' या संस्थेत 'समाज सेवा' या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे.
'मराठवाड्यातील दुष्काळ' हा त्याच्या संशोधन तथा चिंतनाचा विषय असून यानिमित्ताने निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांशी तो जोडला गेलेला आहे.
आगामी काळात 'पाणी' प्रश्नावर मूलभूत काम करण्याची त्याची इच्छा असून आपले वक्तृत्व प्रबोधन तथा परिवर्तनासाठीचे साधन बनले पाहिजे, अशी त्याची अपेक्षा आहे.
प्रसिद्धीपेक्षा प्रौढत्व महत्त्वाचे मानणाऱ्या त्याच्यासारख्या तरुणाचे महाराष्ट्रातील दुष्काळ प्रश्नाविषयीचे नेमके काय चिंतन आहे? हे ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत.
आपण त्याच्या मांडणीचे हार्दिक स्वागत करूया!
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
✔️ सर्व हक्क©️
डॉ. विश्वाधार देशमुख
चलभाष : ९८६०२४०२७८
संदेश : dvishvadhar@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
कृतज्ञतापूर्वक आभार...🙏🏻💐
➡️ जाहिरात पोस्टर : प्रथमेश तेलंग, नांदेड.
➡️ पार्श्वसंगीत : कृष्णा पाळेकर, देगलूर (बासरीवादन).
➡️ संगीत संयोजन : डॉ.शिवराज शिंदे, नांदेड.
➡️ तांत्रिक सहकार्य : अभिलाष महामुने, पुणे.