Перейти к содержимому

SHIV TANDAV STOTRA BY RAVI JADHAV

Ravi Jadhav

0:00 / 0:00

SHIV TANDAV STOTRA BY RAVI JADHAV

376 просмотров · 11 дней назад
Ravi Jadhav
43 подписчика
376 просмотров · 11 дней назад
श्रावण" हा मराठी हिंदू पंचांग मधील पाचवा महिना हा पवित्र मंगलमय संपूर्ण महिना श्री महादेवाला समर्पित आहे. शिव पूजा आराधनेला खास महत्व श्रावणात आहे. अशा या मंगल, पावन -पवित्र श्रावण महिन्याच्या आपणा सर्वाना खूप शुभेच्छा. आज श्रावण कृष्ण 11पुनर्वसू नक्षत्र,या श्रावणी सोमवार अशा शुभ दिनी भगवान शिवाला अत्यंत प्रियं असलेले 🌹||शिव तांडव स्तोत्र ||🌹आपल्या समोर सादर करण्याचा योग जुळून आला आहे.आपणास ते आवडेल अशी आशा धरून श्री शिव चरणी आपणा सर्वांच कल्याण होवो शुभ होवो मंगल होवो ही सदिच्छा प्रार्थना करतो. 🙏🙏🙏 ||श्रीसांबंसदाशिवार्पणमस्तु|| डम डम डम, डम डम डम, डम डम डम,....डम डम, डम डम डम हें असें नऊ वेळा नंतर पाच वेळा असें का? हेतू पुरस्सर वरील शिव तांडव स्तोत्रात का ठेवण्यात आले त्या नंतर जबगडदश जबगडदश जबगडदश ? तर माहेश्वर सूत्र या महर्षी पाणींनी यांनी लिहलेल्या ग्रंथात असें म्हटले आहे कीं, श्री महादेवानी तांडव करताना जेव्हा डमरू नाद केला तो प्रथम नऊ नंतर पाच असा एकूण चौदा वेळा नाद केला. त्यावेळी त्या डमरू नादा मधून चौदा सूत्र (अक्षर) बाहेर पडली ती अशी,......अईऊण, ऋलृक,एओड़,ऐऔच, हयवरट्,लण्, ञमङणनम्,झभञ,घढदष, ९ (नऊ) जबगडदश,खफछठथचटतव्,कपय, शषसर्, हल् ५ (पाच) त्या मधले "जबगडदश"हें एक सूत्र आहे तेच वरील शिव तांडव स्तोत्रात घेतले आहे.याचं चौदा सूत्रांवर आपली संपूर्ण संस्कृत भाषा आणि भाषेचे व्याकरण आधारित आहे. जे महर्षी पाणींनी यांनी रचले. तर 🙏शिव प्रियं भक्तांनो तुम्हाला हें लक्षात आलं असेलच धन्यवाद 🙏