जेलमध्ये Baban Gitte च्या माणसांकडून Walmik Karad ला मारहाणीची चर्चा, बबन गिते नक्की आहे कोण ?
BolBhidu
0:00 / 0:00
जेलमध्ये Baban Gitte च्या माणसांकडून Walmik Karad ला मारहाणीची चर्चा, बबन गिते नक्की आहे कोण ?
51 475 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
51 475 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #BabanGitte #BabanGiteVsWalmikKarad
बीडच्या जेलमध्ये राडा, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गित्तेकडून मारहाण. सोमवारी ही बातमी आली आणि एकच खळबळ उडाली. मारहाण नक्की कोणी कोणाला केली, यावरुनही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पण त्याचवेळी फेसबूकवरची एक पोस्ट व्हायरल झाली. ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’, ही पोस्ट शशिकांत गित्तेच्या नावानं असलेल्या फेसबूक अकांउटवरुन करण्यात आली होती. आता शशिकांत गित्ते म्हणजेच बबन गित्ते. तुरुंगात मारहाण केलेला महादेव गित्ते हा बबन गित्तेचाच खास. बबन गित्ते आणि वाल्मिक कराडची जुनी जानी दुश्मनी. त्यामुळं हे टोळीयुद्ध आता जेलमध्येही सुरू झाल्याची चर्चा झाली.
पण या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला तो बबन गित्ते. बापू आंधळे हत्या प्रकरणात गेले ९ महिने फरार असलेला आरोपी बबन गित्ते. एकेकाळी धनंजय मुंडेंचा खास असलेल्या बबन गित्तेनं मुंडेंच्याच जवळच्या असलेल्या वाल्मिक कराडशी पंगा घेतला. त्यानंतर त्यानं शरद पवार गटात केलेल्या पक्षप्रवेशाचीही जोरदार चर्चा झाली. पोलिस त्याचा शोध घेत असले तरी त्याची माणसं जेलमध्ये कराड गँगचा बदला घेत असल्याचंही बोललं जातंय. पण बबन गित्ते आणि वाल्मीक कराड हे दोघंही मुंडे कुटुंबियांच्याच सावलीत मोठी झालेली माणसं. त्यांच्यात आधी यारानाही होता. नंतर मात्र हाडवैर झालं. इतकं की त्या दोघांनी एकमेकांना संपवण्याच्या आणाभाका घेतल्याचं म्हटलं जातं. एकीकडं वाल्मिक कराडची चर्चा होत असतानाच हा बबन गित्ते नक्की आहे कोण, त्याचं मुंडे कुटुंबाशी काय कनेक्शन आहे आणि बबन गित्ते आणि वाल्मीक कराड एकमेकांच्या जीवावर का उठलेत पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/