Перейти к содержимому

Dasbodh | श्रीमत् दासबोध | दशक विसावा : पूर्णनामदशक | समास नववा : सूक्ष्मनिरूपण

सत्संग

0:00 / 0:00

Dasbodh | श्रीमत् दासबोध | दशक विसावा : पूर्णनामदशक | समास नववा : सूक्ष्मनिरूपण

192 просмотра · 13 дней назад
सत्संग
186 подписчиков
192 просмотра · 13 дней назад
दासबोध हा समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निबीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. ग्रंथराज दासबोधाचा प्रस्तुत अर्थ हा डॉ. श्रीमती कमलताई बा. वैद्य यांनी सुलभ व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेला ग्रंथ आहे. दासबोधातील तत्त्वज्ञान, भक्ती, नीती व व्यवहारज्ञान यांचा अर्थ स्पष्ट करून वाचकांना आध्यात्मिक व व्यावहारिक जीवनासाठी मार्गदर्शन करणारे हे लेखन आहे. ग्रंथराज दासबोध या ग्रंथाची प्रस्तावना श्री ज्ञानेश्वरपदाश्रित, स्वा. गोविंददेव गिरी (आचार्य किशोर व्यास) यांनी लिहिली आहे. प्रस्तावनेत महाराष्ट्राची संतपरंपरा, समर्थकालीन देशस्थिती, समर्थांचे चरित्र व कार्य, शिव–समर्थयोग, अद्वितीय धर्माचार्यत्व आणि ग्रंथराज दासबोध यांचे महत्त्व सविस्तर मांडले आहे. तसेच डॉ. श्रीमती कमलताई बा. वैद्य यांनी वृद्धापकाळात व विकलांग अवस्थेत केलेल्या या महान लेखनसेवेचा गौरव करून, दासबोधाच्या चिंतनातून व्यक्ती व समाजाच्या उन्नतीचा मार्ग स्पष्ट केला आहे आणि समाजाची पुढील पिढी तेजस्वी करण्यासाठी या ग्रंथाचा व्यापक प्रचार व्हावा, अशी विद्न्यापना केली आहे. ग्रंथ वाचन : सौ. अनघा सेलुकर