Перейти к содержимому

यवतमाळ जिल्ह्यासाठी ६९२ कोटी ७३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

Ner News Channel

0:00 / 0:00

यवतमाळ जिल्ह्यासाठी ६९२ कोटी ७३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर

13 281 просмотр · 3 недели назад
Ner News Channel
570 подписчиков
13 281 просмотр · 3 недели назад
यवतमाळ जिल्ह्यासाठी ६९२ कोटी ७३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता तब्बल ६९२ कोटी ७३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ संदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा दिग्रस विधानसभा आमदार मा. ना. संजय राठोड होते. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना या तीनही योजनांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. 💰 तीन योजनांसाठी निधीची तरतूद 🔹 सर्वसाधारण योजना – ४७१ कोटी ५८ लाख रुपये 🔹 आदिवासी उपयोजना – १३७ कोटी १६ लाख रुपये 🔹 अनुसूचित जाती उपयोजना – ८४ कोटी रुपये अशा प्रकारे तीनही मिळून ६९२ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. 👥 बैठकीला मान्यवरांची उपस्थिती या बैठकीला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, जिल्हाधिकारी विकास मीना, तसेच वणीचे आमदार संजय देरकर, राळेगावचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, यवतमाळचे आमदार बाळासाहेब मंगुळकर, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक आणि उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांसह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. 📊 निधीच्या खर्चाचा आढावा मंजूर निधीचा १०० टक्के विनियोग करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. शेतकरी हा केंद्रबिंदू असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. 🎤 NER NEWS या ६९२ कोटींच्या निधीमुळे यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला किती गती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य संपादक – लक्ष्मण वानखडे 9767898848 सहसंपादक- विजय बारसकर 82610 15062 पाहत राहा NATIONAL EKTA REPUBLICAN NEWS ताज्या बातम्यांसाठी चॅनेलला Subscribe करा, Like, Comment आणि Share करायला विसरू नका आणि Bell Icon 🔔 दाबा. धन्यवाद! जय हिंद! . . . . . #viral #viralvideo #yavatmalcollectoroffice #SANJAY RATHOD #SANJAYDESHMUKH #NER NEWS #NATIONALEKTA #REPUBLICAN #JILAAAYOJAN #Jillaadhavabaithak #YAVATMALMAHARASHTRAINDIA #yavatmal #republican #news #india