Duryodhan Temple Durgaon : दूरगावमध्ये वसलय राज्यातील एकमेव 'दुर्योधनाचं मंदिर' | LetsUpp Marathi
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Duryodhan Temple Durgaon : दूरगावमध्ये वसलय राज्यातील एकमेव 'दुर्योधनाचं मंदिर' | LetsUpp Marathi
2 204 просмотра · 4 г. назад
LetsUpp Marathi
701 тыс. подписчиков
2 204 просмотра · 4 г. назад
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक छोटसं गाव दूरगाव...! दूरगावला जाण्यासाठी कर्जतवरून कुळधरण रस्त्यावर जेमतेम अर्ध्या तासाचा रस्ता आहे. दौडपासून साधारण ४० किमी अंतरावर दूरगाव आहे. या छोट्याशा गावात वसलंय राज्यातील एकमेव 'दुर्योधनाचं मंदिर'. असं सांगितलं जातं की दुर्योधन या नावापासूनच दूरगाव हे या गावाचं नाव ठरवण्यात आलं आहे, याच पराक्रमी राजाच्या मंदिरामुळे या गावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. देशात या राजाचे तुरळक मंदिरं आढळतात आणि राज्यात फक्त दूरगावमध्येच दुर्योधनाचं फक्त एकच मंदिर आहे.
गावात प्रवेश करण्यापूर्वीच मंदिर पाहण्याची उत्सुकता वाढते. गाव वस्तीकडं पाठ करून साधारणतः पंधराव्या शतकातील महादेवाचं मंदिर उभं आहे. दगडी चौथऱ्यावर उभं असलेलं आणि बऱ्यापैकी उंची असलेलं मंदिर पहायला मिळतं. मंदिरावर आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसाने उत्सुकता अधिकच वाढते. मंदिरावर काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर दुर्योधन मंदिर दिसतं. दुर्योधनाची मूर्ती कोणी आणली, कधी वसवली याबाबत गावकऱ्यांना तितकीशी माहिती सांगता आली नाही. मात्र अतिशय सुंदर, सुबक आणि लक्षवेधक दुर्योधनाची मंदिरस्थित मूर्ती पाहून खलनायकी प्रवृत्ती असणाऱ्या दुर्योधनाचे मंदिर या गावात असावे ही गोष्टच विलक्षण आहे.
प्रोड्युसर : सागर गोरखे
व्हिडिओ एडिटर : सुहास साबळे
#दुर्योधन #अहमदनगर #mahabharat #temple #Diwali #dipawali #SpecialStory #history #unknowntemple #godshiva #maharashtra #LetsUppMarathi #LetsUppNews #LetsUppApp
-
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
https://letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...