Перейти к содержимому

दसरा स्पेशल व्लॉग ☘️🥰 सणाची एवढी धावपळ अन सासूबाईंसोबत झाला गैरसमज 😱 | Marathi Vlog

Shubhangi world

0:00 / 0:00

दसरा स्पेशल व्लॉग ☘️🥰 सणाची एवढी धावपळ अन सासूबाईंसोबत झाला गैरसमज 😱 | Marathi Vlog

707 просмотров · 5 дней назад
Shubhangi world
183 подписчика
707 просмотров · 5 дней назад
नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या Shubhangi world या चॅनलवर. आजचा व्हिडिओ आपला एकदम खास असणार आहे कारण आज मी तुमच्यासोबत आमचा संपूर्ण दसऱ्याचा दिवस शेअर केला आहे. दोन लहान मुलं, घरचा संसार सांभाळून सणावाराला आपली गृहिणींची किती धावपळ होते हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. अगदी तशीच माझीही खूप गडबड झाली. व्हिडिओच्या सुरुवातीला मी अगदी ५ मिनिटात साधी-सिम्पल कशी तयार झाले ते दाखवलं आहे. त्यानंतर नऊ दिवसांचे घरातले घट उठवणे आणि विसर्जन कसे केले, घरातली मुख्य पूजा आणि दाराला तोरण-हार बांधणे हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये घेतलं आहे. सण म्हटला की स्वयंपाक आलाच, म्हणून आज मी खास दसरा स्पेशल पुरणपोळीचा बेत केला होता, त्याचाही छोटासा व्हिडिओ यात तुम्हाला पाहायला मिळेल. स्वयंपाक झाल्यावर मुलांच्या सायकलची पूजा केली, घरातली हत्यारं आणि शस्त्र पूजन सुद्धा करून घेतलं. आणि शेवटी संध्याकाळी आम्ही एकमेकांना आपट्याची पानं म्हणजेच दसऱ्याचं सोनं देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. दोन मुलांचा सांभाळ करून एवढा मोठा व्हिडिओ बनवणं खरोखर सोपं नसतं, खूप मेहनत लागते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आमचा दसरा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून तुमच्या या बहिणीला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका! #dasaraspecial #marathivlog #dailyvlog #marathivlogger #marathivlog #cooking #dailyvlog #marathirecipe #पुरणपोळी